अशा पुरुषांसोबत डेट करत नाहीत महिला, या पाच सवयींमुळे आवडत नाहीत पुरुष

जर कोणतीच महिला किंवा मुलगी तुमच्यासोबत डेट करू इच्छीत नसेल तर, यामागे तुमची एखादी सवय किंवा व्यक्तिमत्वाचा भाग असू शकतो. चांगल्या रिलेशनशिपसाठी आपल्यातील काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

Women don't like to date with men who do not have these five qualities
प्रतिकात्मक फोटो   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • नकारात्मक विचार असणाऱ्या पुरूषांसोबत महिला डेटवर जात नाहीत.
  • दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तिसोबतही महिला बाहेर जाणे पसंत करत नाहीत.
  • महिलांसोबत डेटवर जाण्यासाठी आपल्यातील स्वाभाविक गोष्टी बदलन्य़ाचा प्रयत्न करू नये.

मुंबई:   प्रत्येकाला असे वाटत असते की, त्याच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असावी जिच्याशी आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकू. आपले भावविश्व आणि मन समजून घेणारी व्यक्ती प्रत्येकालाच हवी असते. परंतु, मुली किंवा स्त्रिया सर्वच प्रकारच्या पुरुषांसोबत डेट करतील असे नाही. अशी कोणती कारणे आहेत की ज्यामुळे स्त्रिया काही पुरुषांसोबत डेटवर जाण्यासाठी तयार होत नाहीत? जर स्त्रिया तुमच्यासोबतही डेटवर येत नसतील तर, यामागील कारणे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. या लेखात सांगितलेली कारणे कदाचीत तुमची मदत करू शकतील. चला तर पाहूया की नेमक्या कशा स्वभावाच्या पुरुषांना महिला डेट करणे पसंत करत नाहीत.

 या पाच कारणांमुळे महिला पुरुषांसोबत डेटवर जाणे टाळतात.

१. नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींसोबत

नकारात्मक विचारांचे व्यक्ती अधिकतर महिलांना आवडत नाहीत. एखादा पुरुष प्रत्येक छोट्या गोष्टींवरून तक्रार करत असेल तर, क्वचितच महिलांना असे पुरुष आवडतात. अशा पुरुषांसोबत कोणतीही महिला डेट करणे पसंत करणार नाही.

२. डेटकडे  एखाद्या कामाप्रमाणे पाहणारे पुरूष

तुम्ही तुमच्या कामाबद्दल फार सजग राहणारे व्यक्ती असाल. परंतु, एखाद्या महिलेशीही औपचारिकतेने आणि एखादे काम पूर्ण करायचे म्हणून जर तुम्ही भेटत असाल तर महिलांना अशा प्रकारची वागणूक कधीही आवडत नाही. अशा प्रकारचा स्वभाव तुमच्या नात्यामध्ये दुरावाही निर्माण करू शकतो.

३. केवळ स्त्रीच्या दिसण्यावर लक्ष असणारे पुरुष

एखाद्या स्त्रीच्या व्यक्तिमत्वातील इतर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जर तुम्ही केवळ तिच्या दिसण्यावर लक्ष केंद्रीत करून फक्त तिच्या लुक्सचेच कौतुक करत असाल तर अशा गोष्टीही स्त्रियांना आवडत नाहीत. अशा पुरुषांचा सहवास महिलांना कधीही आवडणार नाही.

४. दारू पिणारे पुरुष

दारू पिणे ही एक वाईट सवय आहे. एखादी व्यक्ती दारूचे व्यसन करत असेल तर, कोणतीच स्त्री अशा पुरुषासोबत डेटवर जाण्यास तयार नसते. दारू कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा खराब करते यात शंका नाही. 

५. गरजेपेक्षा जास्त कंजूस व्यक्ती

विचारपूर्वक पैसे खर्च करणे ही एक चांगलीच गोष्ट आहे. परंतु, काही व्यक्ती गरजेपेक्षा जास्त कंजूस असतात. ते पैसे खर्च करण्याआधी हजार वेळेस विचार करतात. असे पुरुषही स्त्रियांना फारसे आवडत नाहीत. म्हणून त्या कंजूस व्यक्तीसोबत कधीच डेटवर जाणे पसंत करत नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी