Right To Pee साठी रणरागिणी सरसावल्या, स्वाक्षरी campaign मुळे वाढली उत्सुकता

right to pee campaign for clean and safe toilets : मोफत, स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे मिळायला हवीत, या मागणीसाठी नागपूरमध्ये ‘राइट टू पी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 Women rushed for Right To Pee, curiosity increased due to signature campaign
Right To Pee साठी रणरागिणी सरसावल्या, स्वाक्षरी campaign मुळे वाढली उत्सुकता ।  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नागपूर सिटिझन्स फोरमने ‘राईट टू पी’ नावाची मोहीम सुरू केली
  • या मोहिमेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
  • स्वच्छ व आरोग्यदायी सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्याची मागणी

नागपूर : नागपूर शहरात महानगरपालिका, राज्य सरकार, रेल्वे, एसटी यांच्याकडून सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र यातील बहुतांश शौचालयांची परिस्थिती बिकट आहे. स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांसाठी नागपुर शहरात एक अनोखी मोहीम राबविण्यात येत आहे. येथे नागपूर सिटिझन्स फोरमने ‘राईट टू पी’ नावाची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (maharashtra, Nagpur organisation launches Right to Pee campaign, Right to Pee campaign, clean safe toilets, toilets, woman, nagpur,)

महिलांनी स्वारस्य दाखवले

मंचाचे सदस्य रजत पडोळे म्हणाले, सर्व बाजारपेठांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देणे ही नागपूर महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यांच्या मागण्यांसाठी मंचाने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. गांधीबाग आणि सीताब मेनरोड परिसरातील दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिला व मुलींनी या मोहिमेत मोठी उत्सुकता दाखवल्याचे मंचाचे म्हणणे आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत कमी शौचालये

नागपुरात लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याचा दावा मंचाने केला आहे. मोजक्याच शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याशिवाय सीताबर्डी, महाल, इतवारी या मोठ्या बाजारपेठांमध्ये स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, शौचालयांची संख्या कमी असल्याने बाजारात काम करणाऱ्या महिला आणि मुलींना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. आता मेट्रो सिटी म्हणून विकसित होणाऱ्या नागपूर शहरात या महत्त्वाच्या सुविधांचा अभाव आहे.

आहे आहे राईट टू पी चळवळ

राईट टू पी’ याचा मराठीत शब्दशः अर्थ म्हणजे ‘लघवी करण्याचा अधिकार’! ‘पी’ हा इंग्रजी भाषेतील शब्द ‘लघवी करणे’ या प्रक्रियेसाठी वापरला जाणारा आहे. तर ती प्रक्रिया करण्याचा अधिकार म्हणजे ‘राईट टू पी’!  लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. त्यातील बहुतांश स्वच्छतागृहांची अवस्था ही अगदी न वापरता येण्यासारखी आहे. दुसरीकडे उरलेल्या स्वच्छतागृहांमध्ये ते वापरण्यासाठी कुठे पाच तर कुठे दहा रुपये अशा प्रकारे पैसे आकारले जातात. ते देऊनसुद्धा स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा आपल्याला मिळेल याची खात्री नसते. अनेक ठिकाणी महिलांची छेड काढणे, रेप होणे, तुटक्या खिडक्या आणि दरवाजे अशी परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘राईट टू पी’ची सुरुवात झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी