Women safety tips: नव्या शहरात शिफ्ट होताय? अगोदर वाचा या सेफ्टी टिप्स

महिलांसाठी नवं घर शोधणं, शिफ्टिंग करणं, प्रवास, त्या त्या भागातील संस्कृती यासारख्या अनेक गोष्टी माहिती करून घेण्याची गरज असते. या गोष्टींचा विचार करता, अगोदर भितीची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र आपल्या शेड्युलमध्ये काही सुरक्षेच्या टिप्स समाविष्ट केल्या, तर ही भिती दूर होऊ शकते.

Women safety tips
नव्या शहरात शिफ्ट होण्यापूर्वी वाचा सेफ्टी टिप्स  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नव्या शहरात शिफ्ट होण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज
  • सुरक्षेसंबंधी सर्व गोष्टींची खातरजमा करूनच घ्या निर्णय
  • घर निश्चित करण्यापूर्वी घरमालक, सुविधा, सुरक्षा यांचा विचार करा

Women safety tips: गेल्या काही वर्षात महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांचं (Crime against women) प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा काळजी वाटण्यासारखी परिस्थिती उद्भवते. त्यात जर एखाद्या महिलेला कामानिमित्त, शिक्षणानिमित्त किंवा इतर कुठल्या कारणासाठी आपलं घर सोडून इतर शहरात शिफ्ट होण्याची वेळ आली, तर या काळजीत अधिकच भर पडते. महिलांसाठी नवं घर शोधणं, शिफ्टिंग करणं, प्रवास, त्या त्या भागातील संस्कृती यासारख्या अनेक गोष्टी माहिती करून घेण्याची गरज असते. या गोष्टींचा विचार करता, अगोदर भितीची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र आपल्या शेड्युलमध्ये काही सुरक्षेच्या टिप्स समाविष्ट केल्या, तर ही भिती दूर होऊ शकते. नव्या शहरात शिफ्ट होण्यापूर्वी काही टिप्स लक्षात ठेवल्या, तर तुम्ही अधिक सुरक्षित राहू शकाल आणि तुमची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकाल. जाणून घेऊया, अशाच काही महत्त्वाच्या सेफ्टी टिप्स. 

शहराची संस्कृती समजून घ्या

कुठल्याही शहरात राहायला जाण्यापूर्वी तिथलं कल्चर, संस्कृती समजून घ्या आणि मगच तिथे राहण्याचा निर्णय नक्की करा. ज्या शहरात तुम्ही राहायचा विचार करत आहात, तिथे रात्रीच्या वेळी महिलांना घराबाहेर फिरणं सुरक्षित आहे की नाही, याचा अगोदर शोध घ्या. त्याचप्रमाणे पब्लिक ट्रान्सपोर्ट, कारपूल किंवा इतर कुठला वाहतुकीचा पर्याय सर्वोत्तम आहे, याचाही शोध घ्या. त्या शहरातील लोकांचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, यावरही बारकाईने लक्ष असुद्या. 

अधिक वाचा - Husband wife relationship: पत्नीला अजिबात आवडत नाहीत पतीच्या ‘या’ सवयी, आजपासूनच करा बंद

घर घेण्यापूर्वी आजूबाजूला पाहा

राहण्यासाठी कुठलीही जागा निश्चित करण्यापूर्वी आजूबाजूची परिस्थिती, वस्ती, माहौल, सोयीसुविधा, आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची परिस्थिती, त्यांचे स्वभाव, वर्तन, जवळपासच्या परिसरात असणारी लाईटची स्थिती, पोलिसांची पाळत आणि पेट्रोलिंग, घरमालक याबाबतची सर्व माहिती गोळा करा आणि तपासून पाहा. तुमच्या सोसायटीला सिक्युरीट गार्ड आहे का, सोसायटीत धोबी किंवा इतर सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती येतात का, यासारख्या गोष्टींची माहिती घ्या आणि मगच घराचा व्यवहार करा. 

मौल्यवान वस्तूंची घ्या काळजी

नवीन ठिकाणी राहायला गेल्यानंतर मौल्यवान दागिने घालून रस्त्याने फिरू नका. तुमच्या मौल्यवान वस्तूंचं कमीत कमी प्रदर्शन करा आणि शक्यतो त्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा. 

अधिक वाचा - Tips for staying in hotel: हॉटेलमध्ये एकटं राहायची वाटते भिती? महिलांच्या सुरक्षेसाठी सोप्या टिप्स

आवश्यक नंबरची यादी

तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमचे नातेवाईक, मित्र, शहरातील परिचित लोक यांचे मोबाईल आणि टेलिफोन नंबर एका डायरीत वेगळे लिहून ठेवा. अचानक तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर या डायरीचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. 

डिस्क्लेमर - नव्या शहरात राहायला जाण्यापूर्वी घ्यावयाच्या खबरदारीबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि सामान्यज्ञानावर आधारित सल्ले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी