World Blind Day 2023 Quotes, History, Theme & Importance : संपूर्ण जगभरात 4 जानेवारी हा वर्ल्ड ब्रेल डे (World Braille Day) म्हणजेच जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस लुई ब्रेल यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा करण्यात येतो. ब्रेल लिपीची निर्मिती करणारे लुई ब्रेल यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी आपले डोळे गमावले होते आणि त्यांनी नंतर दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपी बनवली. जाणून घेऊयात लुई ब्रेल यांच्या जयंती निमित्त त्यांची कहाणी... (World Braille Day 2023 Quotes History Theme & Importance read in marathi)
लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये फ्रान्स मध्ये झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी एका अपघातात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. या अपघातात ब्रेल यांनी आपली दृष्टी पूर्णपणे गमावली. मात्र, या अपघातानंतरही त्यांनी हार मानली नाही आणि आपल्यासारख्या दृष्टीहीन व्यक्तींसाठी त्यांनी अशी लिपी निर्माण केली ज्यामुळे आज जगभरातील सर्व दृष्टीहीन व्यक्ती डोळस झाले.
हे पण वाचा : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
(Photo Credit: iStock Images)
लुई ब्रेल यांनी निर्माण केलेली ब्रेल लिपी ही एखादी भाषा नाहीये तर हा एक प्रकारचा कोड आहे. ही एक अशी लिपी आहे जी विशेष प्रकारे कागदावर लिहिण्यात आलेली असते आणि त्यावर असलेले टोकदार, उठावदार टिंबांची लिपी असते. याच टिंबांना स्पर्ष करुन अंध व्यक्तींना वाचता येते. ब्रेल लिपी ही टाईपरायटर सारख्या दिसणाऱ्या 'ब्रेलरायटर' या मशिनने लिहिण्यात येते किंवा 'स्टायलस' आणि ब्रेल स्लेट 'पट्ट' यांचा वापर करुन ब्रेल टंकलेखन करण्यात येते.
हे पण वाचा : हिवाळ्यात नेमकं किती पाणी प्यायला हवे?
World Braille Day साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ब्रेल लिपी हे संवाद करण्याचे साधन म्हणून जनजागृती करणे. तसेच दृष्टीहीन व्यक्तींना त्यांचे अधिकार प्रदान करणे आणि ब्रेल लिपीला प्रोत्साहन देणे हा आहे.
हे पण वाचा : जेवल्यावर अद्रक चघळण्याचे अनेक फायदे
संयुक्त राष्ट्राने 6 नोव्हेंबर 2018 मध्ये एक प्रस्ताव पारित केला होता. या प्रस्तावानुसार, दरवर्षी 4 जानेवारी रोजी ब्रेल लिपीचे विकासक लुई ब्रेल यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांचा सन्मान म्हणून जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्याचं ठरवण्यात आलं.
हे पण वाचा : लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्यावर काय होतं?
वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघातात आपली दृष्टी गमावलेल्या लुई ब्रेल यांनी आपलं शिक्षण पुढे सुरूच ठेवलं. एक स्कॉलरशिप मिळाल्यावर ते रॉयल इंस्टिट्यूट फॉर ब्लाइंड यूथ येथे गेले. तेथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. लुई ब्रेल यांनी दृष्टीहीन व्यक्तींना शिक्षणासाठी आणि लिहिण्या-वाचण्यासाठी मदत व्हावी यासाठी एक खास कोड विकसित केला. याच कोडच्या आधारे आता जगभरातील दृष्टीहीन व्यक्ती वाचू शकतात. आपले शिक्षण घेत असताना एकदा लुई ब्रेल यांची भेट कॅप्टन चार्ल्स यांच्यासोबत झाली. या भेटीनंतर ब्रेल लिपी तयार करण्याचा विचार लुई ब्रेल यांच्या डोक्यात आला.