World Cancer Day 2023 Quotes: जागतिक कॅन्सर दिवसच्या निमित्ताने या आजाराशी लढणार्‍यांना सकारात्मकता देण्यासाठी HD Images

World Cancer Day 2023 Quotes : आज कॅन्सर डे च्या निमित्ताने या दुर्धर आजारावर मात केलेल्या अशाच काही व्यक्तींचे Quotes HD Images च्या माध्यमातून शेअर करून या आजाराशी लढणार्‍यांना बळ द्या.

world cancer day 2023 hopeful quotes hd images by cancer survivors to share via whatsapp facebook
जागतिक कॅन्सर दिवसाचे कोट्स  

World Cancer Day 2023 Quotes : जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस World Cancer Day म्हणून पाळला जातो. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता आबालवृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सर कडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. समज- गैरसमजांचे जाळं आहे. त्यामुळेच आजच्या दिवशी कॅन्सर सारख्या आजाराबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. कॅन्सर डे चं औचित्य साधत अनेकजण या आजारावर मात करून पुन्हा आयुष्य नव्याने जिंकण्याची आशा बाळगणार्‍यांच्या उत्साहाला बळकटी देण्याचादेखील आहे. 

कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर या आजारावरही मात करता येऊ शकते. यामध्ये आज औषधोपचार आणि निदान पद्धतीमध्येही मोठे बदल झाल्याने अनेकांचं जीवन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मदत होत आहे. पण त्यासाठी रूग्णाच्या मानसिक तयारीची आणि सकारात्मक उर्जेची देखील त्याला जोड असणं आवश्यक आहे. मग आज कॅन्सर डे च्या निमित्ताने या दुर्धर आजारावर मात केलेल्या अशाच काही व्यक्तींचे Quotes HD Images च्या माध्यमातून शेअर करून या आजाराशी लढणार्‍यांना बळ द्या.

आपण कर्करोगाने ग्रस्त लढवय्यांना पाठिंबा देऊयात त्यांचा आदर आणि सन्मान देऊयात, त्यांना नैराश्यात जाण्यापासुन वाचवुयात. कर्करोगाच्या रूग्णांच्या बाजूने राहून त्यांना प्रेरणा देण्याचा, आव्हान देण्याचा आणि त्यांचे जीवन अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करूयात. कर्करोगामुळे लोकांना नैराश्यात पडू देऊ नका आणि त्यांच्या आयुष्यावरील आशा गमावू देऊ नका. कॅन्सर होण्याआधी ते जसे आयुष्यावर प्रेम करत होते तसेच जीवन जगायची त्यांना प्रेरणा द्या.


जागतिक कर्करोग दिन 2023 (World Cancer Day 2023 Quotes )

World Cancer Day 2022 Quotes Awareness Messages Wishes 1

World Cancer Day 2023 Quotes । फोटो : टाइम्स नाऊ मराठी 

कर्करोग म्हणजे जीवनाचा अंत नाही. म्हणून, कधीही हार मानू नका. लढत रहा! 

World Cancer Day 2022 Quotes Awareness Messages Wishes

World Cancer Day 2023 Quotes । फोटो : टाइम्स नाऊ मराठी 

कर्क रोगाशी सामना

करणारे आणि कर्क रोगापासून

मुक्त झालेल्या सर्वांना

जागतिक कर्करोग दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा

World Cancer Day 2022 Quotes Awareness Messages Wishes 2

World Cancer Day 2023 Quotes । फोटो : टाइम्स नाऊ मराठी 

कॅन्सरला कधीही तुमच्यावर कब्जा करू देऊ नका.

तुम्ही करोडोमध्ये एक आहात आणि

तुमच्या इच्छाशक्तीने तुमच्या जीवनाचा सर्वोत्तम वापर करा.

World Cancer Day 2022 Quotes Awareness Messages Wishes 4

World Cancer Day 2023 Quotes । फोटो : टाइम्स नाऊ मराठी 

कर्करोग तुम्हाला कधीच होऊ शकत नाही

कारण तुम्ही त्यापेक्षा बरेच काही आहात.

जागरूक राहा आणि या आजाराविरुद्ध उभे रहा.

World Cancer Day 2022 Quotes Awareness Messages Wishes 3

World Cancer Day 2023 Quotes । फोटो : टाइम्स नाऊ मराठी 

जागतिक कर्करोग दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी