World Chocolate Day 2022 Wishes: 'वर्ल्ड चॉकलेट डे' दरवर्षी 7 जुलै रोजी का साजरा करतात? चॉकलेट दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Greeting

World Chocolate Day 2022: आजच्या युगात, उत्सवाचा कोणताही प्रसंग असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेटचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. तुम्हालाही 'चॉकलेट' खायला आवडते का? जर होय, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, लवकरच तुम्हाला तुमचा आवडता दिवस साजरा करण्याची संधी मिळेल. जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी ७ जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील सर्व चॉकलेट प्रेमींसाठी एक खास प्रसंग आहे आणि तो आपल्या जीवनात चॉकलेटचे महत्त्व दर्शवतो.

World Chocolate Day 2022 Wishes: Why is World Chocolate Day celebrated on July 7 every year? Special Wishes, Messages, Greeting to wish you a Happy Chocolate Day
World Chocolate Day 2022 Wishes: 'वर्ल्ड चॉकलेट डे' दरवर्षी 7 जुलै रोजी का साजरा करतात? चॉकलेट दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Greeting  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चॉकलेटची क्रेझ सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते.
  • लोकांना आनंदाच्या प्रसंगी चॉकलेट देऊन सेलिब्रेट करायला आवडते.
  • जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी जुलै महिन्यात साजरा केला जातो.

World Chocolate Day 2022 Wishes in marathi: वाढदिवस, सण-उत्सव किंवा कोणत्याही विशेष दिवसाचे सेलिब्रेशन चॉकलेट शिवाय अपूर्णच ठरते. त्यामुळे खास क्षण गोड करण्यासाठी चॉकलेटचे खास महत्त्व आहे. नाराज असलेल्या व्यक्तीला खूश करण्यासाठी  आणि एखाद्याचा रुसवा काढण्यासाठी करण्यासाठी देखील चॉकलेट दिले जाते. त्याचबरोबर चॉकलेट न आवडणारी व्यक्ती लाखांत एक असेल. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण चॉकलेटचा मनसोक्त आनंद घेतात. आता तर चॉकलेट विविध स्वरुपात उपलब्ध आहे. म्हणजे चॉकलेटचे विविध प्रकार आहेतच. त्याचबरोबर चॉकलेट केक, पेस्ट्री, डोन्टस, आदी.

जागतिक चॉकलेट दिवस हा 7 जुलै रोजी जगभरात साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. हा दिवस 2009 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस 1550 मध्ये युरोपमध्ये चॉकलेटचा वर्धापन दिन मानला जातो. यानिमित्ताने जगभरातील सर्व वयोगटातील लोकांना चॉकलेट खायला आवडते. चॉकलेट हे अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत असल्याचा दावा अनेक अहवालात केला आहे. हे खाल्ल्याने रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. जरी तज्ञांचे मत यावरून भिन्न असू शकते. आजकाल बाजारात हॉट चॉकलेट, मिल्क चॉकलेट, चॉकलेट केक आणि ब्राउनी चॉकलेटसह अनेक उत्पादने उपलब्ध आहेत.

दरवर्षी ७ जुलैला म्हणजे सात-सातला चॉकलेटची साथ आपल्याला मिळावी यासाठी जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जातो.  यंदाच्या जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ही शुभेच्छापत्रं, संदेश, GIFs शेअर करुन आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचा दिवस गोड करा...

जागतिक चॉकलेट डे च्या शुभेच्छा 
 

World chocholate day 2022 marathi message

नाती आणि क्षण गोड करणारं चॉकलेट

तुमच्या आयुष्यात कायम गोडवा आणो...

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

World Chocolate Day 2022 Wishes in marathi 1


नातं हे Chocolate सारखं असावं..

कितीही भांडणं झाली तरी

एकमेकांत गोडवा ठेवणारं...

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

World chocholate day 2022 marathi message 3


माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना

आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या,

Chocolaty शुभेच्छा…

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

World chocholate day 2022 marathi message 4


चॉकलेट डे 2021 शुभेच्छा!
देवाने फक्त आयुष्य दिलं
पण तू ते गोड केलंस

जागतिक चॉकलेट डे च्या गोड गोड शुभेच्छा!

World Chocolate Day 2022 Wishes in marathi 2
‘Five Star’ सारखी दिसतेस,

‘Munch’ सारखी लाजतेस,

‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,

‘Kit-Kat’ ची शपथ,

तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…

Happy World Chocolate Day!

World chocholate day 2022 marathi message 5
चॉकलेट गोड असतंच

पण त्याहून तू गोड आहेस

अन् त्याहूनही मधूर आपली मैत्री आहे

जागतिक चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा!

पण तुम्हाला ठाऊक आहे का? की या चॉकलेटची निर्मिती कशी झाली? तर अमेरिकेत चॉकलेटचा शोध लागला. खरंतर या संदर्भात वेगवेगळी मते आहेत. 4000 वर्षांपूर्वी चॉकलेटची निर्मिती झाली असे काही जण म्हणतात. तर काहीजण चॉकलेटची उत्पती 2 हजार वर्षांपूर्वी झाली असे मानतात.

चॉकलेटच्या निर्मितीबाबत अनेक मते असली तरी आपले आपल्या सर्वांना चॉकलेट खाणे आवडते. तर मनसोक्त चॉकलेटचा आनंद घ्या आणि आजचा चॉकलेट डे मजेत सेलिब्रेट करा. हॅप्पी चॉकलेट डे!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी