World Enviornment Day 2022 : मुंबई : दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जगात कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी संपलेले नाही. जगात तापमानवाढ होत असून अनेक ठिकाणी वातवरण बदलाचा फटका बसत आहे. अशा वेळी पर्यावरणाचे महत्त्व आणखी गडद होत आहे. आज पर्यावरण दिनानिमित्त आपण किमान एक झाड लावायचा संकल्प करूया. तसेच आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा देऊया.
श्वास घेतोय तोवर, जगून घ्यावं छान
झाडालाही कळत नाही, कोणतं गळेल पान
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
पृथ्वीला, निसर्गाला तुमच्यासारखेच जगू द्या
तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं भान असू द्या
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
आपल्याच भविष्याला तडा जाईल असे वागू नका
निसर्गामुळे आपण आहोत विसरू नका
पृथ्वीमातेचे संवर्धन करू
पर्यावरणाला जपून भविष्य घडवू
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रदूषणाला लावूया दूर
पर्यावरणाचा लावा सूर…!
वाहन वापर टाळूया
पर्यावरण रक्षण करु या…
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !
पक्षी हे सुस्वरे आळविती !!
येणे सुखे रुचे एकांताचा वास!
नाही गुण दोष अंगा येत !!
पर्यावरण रक्षण करु या…
आपल्या उद्याला वाचवण्यासाठी
पर्यावरणाशी मैत्री करुया
झाडे लावूया , झाडे जगवूया