World Environment Day : ‘इको फ्रेंडली’ डेटिंगचा येतोय ट्रेंड, वाचा पर्यावरणपूरक डेटिंगच्या 6 कल्पना

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वेगळं काही करण्याची गरज नसतेच. आपल्या नेहमीच्या आयुष्यातच काही पर्यावरणपूरक बदल केले, तर निसर्गाचं संवर्धन आपोआप होतं.

Eco Friendly Dating
इको फ्रेंडली डेटिंग  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • Eco Friendly Dating ला मिळतोय भन्नाट प्रतिसाद
  • नेहमीपेक्षा काही वेगळं केल्याचं समाधान
  • निसर्गाचं संगोपन आणि नात्यांचंही...

World Environment Day | जगभरात 5 जून हा दिवस पर्यावऱण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस केवळ एकमेकांना शुभेच्छा देऊन आणि मेसेज पाठवून साजरा न करता जगभरात अनेक कपल्स आता त्यांच्या आयुष्यात पर्यावरणाचा गांभिर्यानं विचार करताना दिसत आहेत. त्यामुळेच इको फ्रेंडली डेटिंगच्या अनेक कल्पना समोर येत आहेत. 

निसर्गरम्य ठिकाणी डेटिंग

ऑनलाईन डेटिंग करणे किंवा एखाद्या हॉटेलमध्ये प्रत्यक्ष भेटणे याऐवजी अनेक कपल्स आता निसर्गरम्य ठिकाणी भेटणं पसंत करतात. एखादी बाग, टेकडी किंवा तळ्याकाठी एकमेकांना भेटणं आणि तिथं चालत फिरत गप्पागोष्टी करणं याला अनेकजण पसंती देत असल्याचं चित्र आहे. 

इको-फ्रेंडली गिफ्ट्स

तुम्ही तुमच्या डेटला पर्यावरणपूरक गिफ्ट देऊन इंप्रेस करू शकता. उदाहरणार्थ इको फ्रेंडली कॉफी कप, घरात झाडं लावण्यासाठी एखादी कुंडी किंवा रोप यासारखं गिफ्ट देऊन तुम्ही तुमचा वेगळेपणा दाखवू शकता. शिवाय नेहमीच्या टिपिकल गिफ्टपेक्षा या गोष्टी हटकेही वाटतील.

निसर्गरम्य ठिकाणी पिकनिक

एखाद्या मोठ्या मैदानावर उगवलेल्या गवतावर सतरंजी अंथरून बसल्याला किती दिवस झाले? अशा ठिकाणी डेटसाठी जाणं, तिथं जमिनीवर बसून डबा खाणं यातला आनंद अवर्णनीय असतो. तुमचं निसर्गावर किती प्रेम आहे, हेदेखील तुम्ही यातून दाखवू शकाल आणि तुमच्या डेटसोबत अधिक घट्ट नातं जोडू शकाल. 

पर्यावरणपूरक हॉटेल

जर तुम्हाला हॉटेलमध्येच जाण्याचा मूड असेल तर जरूर जा. पण त्यासाठी असं हॉटेल निवडा जिथं पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान होईल, याची काळजी घेतली जाते. जिथे विघटन होणाऱ्या वस्तू अधिकाधिक असतात आणि त्याची बांधणी पर्यावरणपूरक केलेली असते. 

चालणे किंवा सायकल डेट

दूरवर चालायला जाणे किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सायकल डेटवर जाणे, यासारखी कूल आयडिया आणखी कुठली असू शकते? या डेटमुळे तुम्ही प्रदूषणही कमी करता शिवाय काही कॅलरीज जळाल्यामुळे फिट आणि आनंदी राहता. 

समुद्रकिनाऱ्यांची सफाई

तुम्ही अशीही एक डेट प्लॅन करू शकता ज्यात तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बिच स्वच्छ करण्यासाठी वेळ काढाल. दोघांनी एकत्रितपणे बिचचा एखादा भाग स्वच्छ करणे, तिथला कचरा गोळा करून तो योग्य ठिकाणी टाकणे आणि निर्मळ किनाऱ्यावर प्रेमाच्या गप्पा मारत बसणे ही कल्पना कुणाला नाही आवडणार? 

चला तर मग. वाट कशाची पाहताय? तुम्हाला यापैकी जी कल्पना सर्वात जास्त आवडेल, त्यापासून सुरूवात करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी