World Meteorological Day : कधी आहे जागतिक हवामान दिन, काय आहे या दिवसाचे महत्त्व?

World Meteorological Day 2023 Know History Significance And Theme : दरवर्षी 23 मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस गुरुवार 23 मार्च 2023 रोजी आहे.

World Meteorological Day
जागतिक हवामान दिन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कधी आहे जागतिक हवामान दिन
  • काय आहे या जागतिक हवामान दिनाचे महत्त्व
  • जाणून घ्या जागतिक हवामान दिनाची यंदाची संकल्पना

World Meteorological Day 2023 Know History Significance And Theme : दरवर्षी 23 मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस गुरुवार 23 मार्च 2023 रोजी आहे. बदलत्या हवामानाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

जागतिक हवामान संघटनेची स्थापना 23 मार्च 1950 रोजी झाली. या संस्थेचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी काम करते. या संस्थेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ 1961 पासून दरवर्षी 23 मार्च या दिवशी जगभर जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. यंदा गुरुवार 23 मार्च 2023 रोजी जागतिक हवामान दिन आहे.

उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे

उन्हाळ्यात या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायद्याचे

जागतिक हवामान संघटना दरवर्षी जागतिक हवामान दिनानिमित्त नवी संकल्पना (थीम) जाहीर करते. या संकल्पनेच्याआधारे जागतिक हवामान संघटनेचे सदस्य असलेले सर्व देश जागतिक हवामान दिन साजरा करतात. या वर्षी भविष्यातले हवामान तसेच हवामान आणि पाण्याचे भविष्य या संकल्पनेआधारे जागतिक हवामान दिन साजरा केला जाईल.

पांढरा कांदा खाण्याचे फायदे

कांदा दीर्घकाळ सुरक्षित साठवण्याच्या TIPS

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी