World Sparrow Day : कधी आहे आंतरराष्ट्रीय चिमणी दिन? का साजरा करतात हा दिवस?

लाइफफंडा
Updated Mar 19, 2023 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

world sparrow day 2023 date history theme significance celebration : दरवर्षी 20 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन अर्थात जागतिक चिमणी दिन किंवा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस किंवा जागतिक चिमणी दिवस साजरा करतात.

World Sparrow Day
कधी आहे आंतरराष्ट्रीय चिमणी दिन, का साजरा करतात हा दिवस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कधी आहे आंतरराष्ट्रीय चिमणी दिन?
  • का साजरा करतात हा दिवस?
  • कोणत्या देशाच्या चुकांमुळे जगाने ओळखले चिमण्यांचे महत्त्व?

world sparrow day 2023 date history theme significance celebration : दरवर्षी 20 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन अर्थात जागतिक चिमणी दिन किंवा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस किंवा जागतिक चिमणी दिवस साजरा करतात. पहिला जागतिक चिमणी दिवस 20 मार्च 2010 रोजी साजरा झाला. यंदा रविवार 20 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन आहे. 

पृथ्वीवरची चिमण्यांची संख्या कमी होत आहे. याच कारणामुळे चिमणी या पक्ष्याच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने चिमणीचे महत्त्व समजावून सांगितले जाते तसेच चिमण्यांसाठी काय करता येईल यासाठी मार्गदर्शन केले जाते. 

चीनने 1958 ते 1962 या काळात उंदीर, माशा, डास आणि चिमणी हे चार प्रजाती नष्ट करून शेतीचे संरक्षण करण्याची मोहीम हाती घेतली. यामुळे चीनमधील चिमण्या नष्ट झाल्या. याचा पर्यावरणाच्या समतोलावर गंभीर परिणाम झाला. पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. यानंतर जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांनी चिमणी जगवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जगात 26 प्रकारच्या चिमण्या आहेत. यापैकी 23 प्रकारच्या चिमण्यांचे फोटो उपलब्ध आहेत. 

जगातील 26 प्रकारच्या चिमण्यांपैकी 5 प्रकारच्या चिमण्या भारतात आढळतात. चिमणी किटकभक्षी आहे. चिमणी ज्या प्रमाणात पिकं खाते त्यापेक्षा जास्त किटक खाते आणि शेतीचे अप्रत्यक्षपणे रक्षण करते. याच कारणामुळे चिमणीचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. 

मागील 25 वर्षात भौतिक प्रगती वेगाने झाली पण 867 प्रजातींच्या पक्ष्यांच्या संख्येत घट झाली. पर्यावरणाच्या समतोलाचा विचार केल्यास ही चिंतेची बाब आहे. यातही चिमण्यांची संख्या कमी होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण चिमण्या मर्यादीत प्रमाणात शेतातील पिके खातात आणि मोठ्या प्रमाणात शेतातील किडे अळ्या यांचे भक्षण करतात. यामुळे पिकांचे रोगराईने नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते. याच कारणामुळे चिमणी जगवणे आवश्यक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. 

भारतात शहरी भागांमध्ये चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हळू हळू ग्रामीण भागातही चिमण्यांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चिमणी दिन साजरा करण्याचा निर्णय झाला आहे.

नाशिकच्या नेचर फॉरएव्हर सोसायटी (Nature Forever Society) संस्थेने 2009 मध्ये पहिल्यांदा चिमणी दिन साजरा केला. या उपक्रमात सहभागी झालेल्या इतर संस्था आणि नेचर फॉरएव्हर सोसायटी या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे 2010 पासून दरवर्षी 20 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 

बिर्याणीचे हे प्रकार माहिती आहेत का?

एप्रिल महिन्यात फिरण्याची भारतातील उत्तम ठिकाणे

चिमण्या कमी होण्याची प्रमुख कारणे

  1. औद्योगिकरणामुळे वातावरणात होत असलेला बदल आणि वाढते प्रदूषण
  2. शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी होणे, सीमेंटचे बांधकाम वाढणे
  3. विजेच्या तारा, मोबाईलचे नेटवर्क यांचे जाळे निर्माण होणे 
  4. शेतात कृत्रिम खते, रसायने आणि किटकनाशके यांचा वाढलेला वापर
  5. वाढते ध्वनी प्रदूषण

चिमणी संवर्धनाचे उपाय

  1. पाणथळ जागांची निर्मिती करणे, पक्षी पाणी प्यायला ज्या ठिकाणी येतात त्याच भागात मर्यादीत त्यांना सहज खाता येईल अशा प्रकारे मर्यादीत धान्य ठेवणे
  2. पक्ष्यांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे
  3. शेतातील किटकनाशके, रसायने यांचा वापर कमी करणे
  4. चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे
  5. चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासासोबतच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडे लावणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी