World Water Day : बुधवार 22 मार्चला जागतिक जलदिन, काय आहे या दिवसाचे महत्त्व

World Water Day 2023 : History, significance, theme : दरवर्षी 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जलदिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे तसेच त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे हा संदेश जगभर पोहोचविण्यासाठी ‘जागतिक जलदिन’ साजरा करतात. 

World Water Day
बुधवार 22 मार्चला जागतिक जलदिन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बुधवार 22 मार्चला जागतिक जलदिन
  • काय आहे जागतिक जलदिन या दिवसाचे महत्त्व
  • यंदाची जागतिक जलदिनाची संकल्पना

World Water Day 2023 : History, significance, theme : दरवर्षी 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जलदिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे तसेच त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे हा संदेश जगभर पोहोचविण्यासाठी ‘जागतिक जलदिन’ साजरा करतात. 

संयुक्त राष्ट्रांच्यावतीने दरवर्षी 22 मार्चला जागतिक जलदिनानिमित्त जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्वच्छता, पाणी, जलस्रोतांची स्वच्छता, जलस्रोतांचे संरक्षण यासाठी जनजागृती करणे तसेच जलस्रोतांची स्वच्छता आणि जलस्रोतांचे संरक्षण यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे काम संयुक्त राष्ट्रांच्यावतीने केले जाते. 

पहिल्यांदा 22 मार्च 1993 रोजी संयुक्त राष्ट्रांच्यावतीने ‘जागतिक जलदिन’ साजरा करण्यात आला. यानंतर दरवर्षी 22 मार्चला ‘जागतिक जलदिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमध्ये जागतिक जलदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

दरवर्षी वेगवेगळी संकल्पना अर्थात थीम राबवून ‘जागतिक जलदिन’ साजरा करतात. यंदा पाणी आणि स्वच्छता ही संकल्पना आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी पाण्याचा जपून आणि सुयोग्य वापर करणे तसेच या कामांसाठी जलस्त्रोतांचे व्यवस्थापन करणे ही 2023 च्या जागतिक जलदिनाची संकल्पना आहे.

Gudi Padwa rangoli design 2023 : मराठी नववर्ष गुढी पाडवा साजरा करण्यासाठी घराच्या दारासमोर काढा ही आकर्षक रांगोळी, बघा व्हिडीओ

पाण्याबाबतचा अहवाल

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार दरवर्षी अशुद्ध पाण्यामुळे 14 लाख नागरिकांचा मृत्यू होतो. अशुद्ध पाण्यामुळे दरवर्षी 7 कोटी 40 लाख नागरिकांच्या आयुर्मानात घट होते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जगाची शुद्ध पाण्याची मागणी सध्याच्या मागणीच्या तुलनेत 2050 पर्यंत आणखी 55 टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे पाण्याचा जपून वापर करणे ही काळाची गरज आहे. 

गुढी पाडव्यात काढा ही आकर्षक रांगोळी

उन्हाळ्यात या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायद्याचे

कांदा दीर्घकाळ सुरक्षित साठवण्याच्या TIPS

पाण्याच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने हे करावे

  1. पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करा
  2. स्वतः पाण्याचा स्रोत प्रदूषित करू नका तसेच कोणालाही पाण्याचा स्रोत प्रदूषित करू देऊ नका
  3. जगात गोडे पाणी मर्यादीत प्रमाणात उपलब्ध आहे ते जपून वापरा
  4. पिण्याचे पाणी सर्वांना गरजेप्रमाणे मिळेल यासाठी आपल्याला शक्य असेल तेवढ नियोजन करा
  5. रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचे पाणी जमिनीखाली टाक्यांमध्ये साठवून वापरणे
  6. पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम राबवून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढावी यासाठी प्रयत्न करणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी