महिला दिनी गृहिणींनी शोधल्या स्वत:तील उद्योजिका

सामान्य गृहिणीही एक उद्योजिका होऊ शकते, याचं बीज रुजविण्याचा एक प्रायोगिक प्रकल्प आज महिला दिनी गिरगावात राबविण्यात आला.  यातून सामान्य गृहिणींनी आपल्यातील कला-गुणांना कॉर्पोरेट लूक आणि प्रोसेसची जोड दिली. 

world woman's day celebration in girgaon with innovative idea kamat chawl
महिला दिनी गृहिणींनी शोधल्या स्वत:तील उद्योजिका  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : सामान्य गृहिणीही एक उद्योजिका होऊ शकते, याचं बीज रुजविण्याचा एक प्रायोगिक प्रकल्प आज महिला दिनी गिरगावात राबविण्यात आला.  यातून सामान्य गृहिणींनी आपल्यातील कला-गुणांना कॉर्पोरेट लूक आणि प्रोसेसची जोड दिली. 

गिरगावातील कामतचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा १२५ ने वर्ष साजरे करीत आहे. या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महिलादिनी चाळीतील महिलांना एकत्र आणून त्यांच्यातील कलागुणांना व्यावसायीक टच देण्याची संकल्पना क्रिएटीव्ह आर्टिस्ट शुभा सामंत यांनी मांडली.  या उपक्रमाला स्वपरिचय असे नाव देण्यात आले.  याला चाळीतील महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही प्रोसेस सुमारे ६ महिने सुरू होती. त्यानंतर जे मूर्त रूप आले, ते डोळे दीपविणारे होते. 

या उपक्रमाबद्दल बोलताना शुभा सामंत म्हणाल्या, केवळ आपल्या एखादी गोष्ट चांगली करता येते म्हणून अनेक महिला घरगुती व्यवसाय करतात. पण त्यांना ब्रँडिग, पॅकेजिंग, मार्केटिंग याची जोड नसते.  आपले प्रोडक्ट लॉन्च करताना त्याचा लोगो काय असावा, त्या प्रोडक्टची मांडणी काय असावी या बद्दल जागरुकता नसते. ही एक प्रोसेस असते ती प्रोसेस मी या १८ महिलांकडून करून घेतली. सुरूवातीला बुजणाऱ्या महिला एक दोन बैठकीनंतर खुलून आल्या आणि त्यांनी ही प्रक्रिया एन्जॉय केली. आपले घरातील काम सांभाळून त्यांनी या 'स्वपरिचय' महिलांनी महिलासाठी केलेल्या उपक्रमात स्वतःला झोकून दिले आणि शेवटीचे काही पाहता ते अत्यंत सुखकारक आहे, असेही सामंत यांनी सांगितले. 

यात अनेक खाद्य पदार्थ, कला कुसरीचे साहित्य,हर्बल प्रोडक्ट या पारंपरिक स्टाॅल व्यतिरिक्त लैंगिक छळांबाबत मुलांना बोलतं करणारी स्टोरीवाली दीदीचाही आगळा वेगळा स्टाॅल या ठिकाणी अनेकांचे लक्ष वेधत होता. तसेच लहान मुलांना मराठी संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी गुणवानमराठी बीज सुगंधाचे हा आगळा वेगळा स्टॉलही पाहायला मिळाला.  तसेच कागदापासून अत्यंत कलात्मकपद्धतीने हार बनविणारा स्टॉलही या ठिकाणी पाहायला मिळाला. तेथे नोटांना अत्यंत कल्पकपण तयार केलेले हारही पाहायला मिळाले. पर्यावरणाला पुरूक आणि कोणत्याही प्रकारचे केमिकल नसलेले डीशवॉश आणि इतर गृहोपयोगी प्रो़डक्ट पहिल्यांदाच या ठिकाणी पाहायला मिळाले. 

महिलांना उद्योगासाठी व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न होता. हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे समाधान सर्व महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आता यापुढे हा व्यवसाय या महिला पुढे कायम ठेवणार असून त्यांनी त्यात यशस्वी होण्याचा चंगही बांधला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...