yashwantrao chavan birth anniversary wishes, yashwantrao chavan birth anniversary wishes in marathi, yashwantrao chavan birth anniversary marathi wishes : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. यशवंतरावांचे पूर्ण नाव यशवंत बळवंत चव्हाण होते. त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी देवराष्ट्र येथे झाला. बालपणीच वडिलांचे मायेचे छत्र गमावलेल्या यशवंतरावांचा सांभाळ त्यांच्या आई विठाबाई यांनीच केला. विठाबाई यांनी त्यांच्या भावाच्या मदतीने लहानग्या यशवंतची काळजी घेतली, त्याला मोठे केले, शिकवले. विठाबाईंनी यशवंतला बालपणापासूच देशप्रेम आणि स्वावलंबनाचे धडे दिले. त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केले. याचे चांगले परिणाम झाले. आयुष्यभर जनसेवा करणाऱ्या या व्यक्तीने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडघडणीत मोलाची भूमिका बजावली.