तुम्हीही ब्युटी पार्लरमध्ये हेअर वॉश करत असाल तर सावधान, महिलेला आला स्ट्रोक

लाइफफंडा
रोहित गोळे
Updated Nov 01, 2022 | 16:03 IST

Beauty Parlour stroke syndrome : एका 50 वर्षीय महिलेने ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन हेअर वॉश केल्यानंतर तिला अचानक स्ट्रोक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

you also get hair wash done in beauty parlor so be careful woman got stroke
तुम्हीही ब्युटी पार्लरमध्ये हेअर वॉश करत असाल तर सावधान,, महिलेला आला स्ट्रोक (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • हैदराबादमध्ये हेअर वॉश करत असलेल्या महिलेला आला पक्षाघाताचा झटका
  • हेअर वॉशदरम्यान मानेची नस चुकीच्या पद्धतीने दाबल्याने पक्षाघात झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे
  • वैद्यकीय जगतात याला 'ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम' म्हणून ओळखले जाते

Beauty parlour stroke syndrome : केस धुण्यासाठी आणि मसाज करण्यासाठी सलूनमध्ये जाणाऱ्या लोकांनी, विशेषत: महिलांनी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण हैदराबादमधील एका ब्युटी पार्लरमध्ये हेअर वॉश करण्यासाठी गेलेली 50 वर्षीय महिलेचा जीव थोडक्यात वाचला आहे. वास्तविक, केस कापण्यापूर्वी महिला आपले केस धुत होती, त्याच वेळी तिला अचानक पक्षाघाताचा झटका (Stroke) आला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, महिलेने केस धुण्यासाठी मान खाली केली तेव्हा तिच्या मेंदूला रक्त पोहचविणारी रक्तवाहिनी अचानक दाबली गेली आणि त्यामुळे तिला पक्षाघाताचा झटका आला. (you also get hair wash done in beauty parlor so be careful woman got stroke)

ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम

वैद्यकीय भाषेत या प्रकारच्या समस्येला 'ब्यूटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम' असे नाव देण्यात आले आहे. पार्लरमध्ये स्ट्रोकची पहिली घटना अमेरिकेत 1993 मध्ये नोंदवली गेली होती. त्यानंतर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सलूनमध्ये मानेचा मसाज करण्यासाठी येणाऱ्या पुरुषांमध्ये अशा तक्रारी सर्रास पाहावयास मिळत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा: Blackheads Removal Tips: डेड स्किन-ब्लॅकहेड्सला म्हणा Bye-Bye, लावा हा फेस पॅक; चेहऱ्यावर येईल Glow

रक्तवाहिनी चुकीच्या पद्धतीने दाबली गेल्यामुळे येतो स्ट्रोक 

TOI च्या अहवालानुसार, KIMS सिकंदराबाद येथील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण कुमार यदा म्हणतात, 'मसाजरने मान आणि डोके प्रचंड दाबासह दाबले गेल्यास अशा प्रकारची समस्या उद्भवते. साधारणत: सलूनमध्ये अशा प्रकारची समस्या निर्माण होते. या प्रक्रियेत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला दुखापत होते आणि नंतर व्यक्तीला पक्षाघाताचा झटका येतो.' डॉ. प्रवीण यांनी गेल्या काही वर्षांत पार्लरमध्ये स्ट्रोकची अनेक प्रकरणे पाहिली आहेत.

आधीही महिले गेलेली डॉक्टरांकडे 

चक्कर येणे, मळमळ आणि उलट्या ही स्ट्रोकची सामान्य लक्षणे आहेत. पार्लरमध्ये गेलेल्या महिलेच्या या सर्व तक्रारी होत्या. 50 वर्षीय महिला ही आधी डॉक्टरांकडेही गेली होती. यावेळी तपासणीत काही वेगळ्या समस्या आढळून न आल्याने त्या डॉक्टरांनी महिलेला न्यूरोलॉजिस्टकडे पाठवले होते.

अधिक वाचा: Relationship Tips: पुरुषांच्या ‘या’ सवयी जातात पार्टनरच्या डोक्यात, तुटू शकतं नातं

मानेमध्ये रक्ताची गाठ

डॉ. सुधीर कुमार, वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स, जुबली हिल्स यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, 'स्ट्रोकच्या 24 तासांनंतर ही महिला त्यांच्याकडे आली होती. तेव्हा स्ट्रोकची प्रमुख लक्षणे निघून गेली होती. पण ती अशक्त दिसत होती. त्यामुळे तिला पक्षाघाताचा झटका आल्याची आम्हाला शंका आली. त्यामुळे आम्ही तिला एमआरआय करायला सांगितला. एमआरआय तपासणीत महिलेच्या मानेच्या मागील भागात रक्ताच्या गाठी झाल्याचेही दिसून आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी