तुम्ही तुमच्या मुलाला भेसळयुक्त दूध तर देत नाहीत ना? या पद्धतींनी ओळखा खरं दूध

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 25, 2023 | 22:59 IST

Milk Check Real or Fake: मागील काही वर्षापासून महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या खिश्यावरील बोझ वाढला आहे. त्यात भेसळयुक्त पदार्थांनेही आरोग्याची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसापासून दुधात भेसळ (adulterated milk) करण्याचे प्रमाण वाढले आहे. दूध असा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरला जातो.

Isn't the milk that comes home from the market adulterated?
बाजारातून घरात येणारं दूध भेसळयुक्त तर नाही ना?   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती दुधाचे सेवन करतात.
  • दुधात उच्च दर्जाची प्रथिने आणि जीवनसत्त्व 'ब' च्या व्यतिरिक्त कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड' असते.
  • भेसळयुक्त दूध किंवा त्याच्या प्रोडक्ट्सचा वापर केल्यास अनेक आजारांचा धोका वाढतो.

Milk Check Real or Fake: मागील काही वर्षापासून महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या खिश्यावरील बोझ वाढला आहे. त्यात भेसळयुक्त पदार्थांनेही आरोग्याची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसापासून दुधात भेसळ (adulterated milk) करण्याचे प्रमाण वाढले आहे. दूध असा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरला जातो. यामुळे आपण घेतलेलं दूध हे भेसळयुक्त असेल तर  ते आपण  मुलाला देत असू  त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. (You don't give adulterated milk to your child do you? Identify real milk by these methods)

अधिक वाचा  : लग्नाला उशिर कराल तर बाप बनण्यास होईल अडचण

अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती दुधाचे सेवन करतात. दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. दुधात उच्च दर्जाची प्रथिने आणि जीवनसत्त्व 'ब' च्या व्यतिरिक्त कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड' असते जे हृदय सुदृढ राखतात आणि आपले वजन सुद्धा नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. परंतु भेसळमुळे या दुधाचा आरोग्यासाठी फायदा होत नाही. उलट भेसळयुक्त दूध आपल्या शरीरात गेल्याने त्याचा विपरित परिणाम होत असतो. 

अधिक वाचा  : तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे फळांचा राजा

भेसळयुक्त दूध पिण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे याआधी जिथे तुमची प्रकृती बिघडेल तिथे तुम्ही आजारीही पडू शकता. जर भेसळयुक्त दूध किंवा त्याच्या प्रोडक्ट्सचा वापर सलग दोन वर्षे केला गेला तर ते आपल्या इंटेस्टाइन, यकृत आणि मूत्रपिंडाचेच नुकसान करीत नाही तर इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.परंतु भेसळाच्या कारभारामुळे खऱ्या दुधाच्या नावाखाली सर्वसामान्यांना भेसळयुक्त दूध घरी नेण्यास भाग पाडलं जातं आहे. त्यात आपल्याला खरं आणि भेसळयुक्त यातील फरक करता येत नाही.  या संदर्भात आज आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि नकली दूध सहज ओळखू शकाल.

अधिक वाचा  :वजन वाढण्यासाठी ऑफिसमधल्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत

कसं ओळखाल दुधातील भेसळ 


खऱ्या दुधाची ओळख करण्यासाठी तुम्हाला थोडेसे दूध हे स्टाईलवर टाकावे लागेल. टाइलवर दूध ओतल्यानंतर टाइलवर पांढरी रेषा दिसली तर याचा अर्थ हे दूध खरे आहे. 
​युरिया भेसळ शोधणे

दुधाची ओळखण्यासाठी तुर डाळीची पावडर करावी लागेल. त्यात दूध टाकावे लागेल. मग 15 मिनिटासाठी ते मिश्रण असेच सोडून द्या. जर 5 मिनिटांनी दुधाचा रंग लाल झाला तर समजून घ्या की या दुधात युरियाची भेसळ आहे. एक चमचा दूध आणि सोयाबीन पावडर नीट मिसळा, साधारण पाच मिनिटांनी लिटमस पेपर या मिश्रणात बुडवा, जर ते निळे झाले तर दुधात युरियाची भेसळ आहे. 

अधिक वाचा  : पिवळी साडी नेसून भोजपुरी अभिनेत्रींने लावली आग

​आयोडीनची भेसळ 

दुधात स्टार्चची भेसळ शोधण्यासाठी 5 मिली दुधात 2 चमचे आयोडीन मिसळा, जर दुधाचा रंग निळा झाला तर दुधात स्टार्चची भेसळ झाली आहे.

अधिक वाचा  : दर्दी परिणीति चोप्रा ,एक नाही अनेकवेळा तुटलंय दिल

डिटर्जंटची भेसळ 

दुधाची पारख करण्यासाठी अजून एक पद्धत आहे, यासाठी तुम्हाला दोन बोटात दूध घालावे लागेल. त्या दुधाला मसळा. त्यातून जर डिटर्जंट सारखा वास येत असेल तर याचा अर्थ ते बनावट आणि कृत्रिम दूध आहे.आम्ही वर नमूद केलेल्या पद्धतींच्या मदतीने आता तुम्हाला खरे आणि नकली दूध सहज ओळखता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी