10 Beautiful Places: आयुष्यात एकदा तरी 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या, जिवंतपणी अनुभवता येईल स्वर्गसुख

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 22, 2022 | 13:06 IST

10 Beautiful Tourist Places In India: नवनवीन जागेवर फिरून तुम्हाला नवीन ठिकाणांची माहिती मिळत असते. मग तेथील स्मारके, मंदिरे, तलाव, मठ आणि पर्यटन स्थळांचा (tourist spots) इतिहास आणि सद्यांची स्थिती तुमच्या डोळ्यासमोर असते. फिरणं, प्रवास करणं ही एक थेरपी आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन रंगीबेरंगी बनवू शकता आणि नैराश्यावर मात करू शकता.

10 Beautiful Tourist Places In India
भारतातील 10 सुंदर पर्यटन स्थळे 
थोडं पण कामाचं
  • फिरणं (Traveling) ही एक आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट आहे. प्रवास करणं खूप मजेदार असतं.
  • आज आम्ही तुम्हाला अशा 10 ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही आयुष्यात एकदा तरी किंवा म्हातारपणापूर्वी नक्की भेट द्यावी.
  • या ठिकाणांना भेट देण्यासाठी फक्त देशातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येत असतात.


नवी दिल्ली: 10 beautiful places in india: फिरणं (Traveling) ही एक आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट आहे. प्रवास करणं खूप मजेदार असतं. तुम्ही एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यावर तुम्ही केवळ नवीन जागेला भेट देत नाही तर तुम्ही तिथल्या संस्कृती, इतिहास, सुंदरता, खाद्यपदार्थ (culture, history, beauty, food)आणि जीवनशैलीचीही (lifestyle) ओळख होते. नवनवीन जागेवर फिरून तुम्हाला नवीन ठिकाणांची माहिती मिळत असते. मग तेथील स्मारके, मंदिरे, तलाव, मठ आणि पर्यटन स्थळांचा (tourist spots)  इतिहास आणि सद्यांची स्थिती तुमच्या डोळ्यासमोर असते. फिरणं, प्रवास करणं ही एक थेरपी आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन रंगीबेरंगी बनवू शकता आणि नैराश्यावर मात करू शकता. जेव्हाही तुम्ही नवीन ठिकाणे पाहून तुमच्या कामावर परतता, तेव्हा तुम्हाला आतून उत्साही वाटतं. 

आज आम्ही तुम्हाला अशा 10 ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही आयुष्यात एकदा तरी किंवा म्हातारपणापूर्वी नक्की भेट द्यावी. जर तुम्ही या ठिकाणांना भेट दिली नाही तर तुम्हाला आयुष्यात काहीतरी चुकल्यासारखं नक्की वाटेल. ही सर्व ठिकाणे भारतात आहेत. या ठिकाणांना भेट देण्यासाठी फक्त देशातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येत असतात. जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल.

लडाख

लडाखमध्ये तुम्हाला दूरवर पसरलेले पर्वत, तलाव आणि निसर्गाच्या अद्भुत दृश्य पाहायला मिळेल. लडाखमध्ये एकापेक्षा जास्त पर्यटन स्थळे आहेत.  सुंदर पॅंगॉन्ग तलाव आणि लेह पॅलेसला तुम्ही भेट देऊ शकतात. प्रत्येकानं एकदा तरी आयुष्यात लडाखला भेट नक्की द्यावी. येथे तुम्ही तिबेटी आणि बौद्ध संस्कृती अगदी जवळून पाहता येते आणि येथील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता.

अधिक वाचा-  Sonalee Kulkarniच्या सर्वात जवळच्या व्यक्तीनं घेतला जगाचा निरोप, शेअर केला इमोनशल Video

गोवा

गोवा हे असं एक ठिकाण आहे जिथे प्रत्येकाला भेट द्यायची असते. प्रत्येकाला इथे जाऊन मजा करायची असते. गोव्याचे नाव मनात येताच पर्यटकांच्या मनात समुद्रकिनारा आणि नाईट लाईफची कल्पना दूरवर पसरते. गोवा हे तरुणांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे. येथे फिरण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी खूप काही आहे. यामुळेच प्रत्येक तरुणानं एकदा तरी गोव्याला जायला हवे.

उटी

तमिळनाडूतील उटी हिल स्टेशनला 'हिल स्टेशन्सची राणी' म्हटले जाते. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे अतिशय सुंदर हिल स्टेशन निलगिरी टेकड्यांमध्ये वसलेले आहे. जिथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने फिरायला येतात. येथे पर्यटकांना चहाचे मोठे मळे, तलाव, धबधबे आणि भव्य बागा पाहायला मिळतात.

औली

औलीला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणता येईल. या हिल स्टेशनचे सौंदर्य प्रत्येक पर्यटकाच्या हृदयात उतरते. जर तुम्ही अजून औलीला भेट दिली नसेल, तर एकदा नक्की या. उत्तराखंडमध्ये वसलेल्या औलीला मिनी स्वित्झर्लंड असे म्हटले जात. उंच पर्वत, धबधबे, नद्या आणि घनदाट पाइन झाडे असलेली जंगले पर्यटकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. येथे त्रिशूल शिखर, चिनाब तलाव, नंदा देवी हिल स्टेशन, जोशीमठ ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

माउंट अबू

माउंट अबू हिल स्टेशन हे राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात आहे. हे हिल स्टेशन अरवलीच्या डोंगरांनी वेढलेले आहे.  या हिल स्टेशनला राजस्थानचे मसुरी म्हणतात. माउंट अबू जमिनीपासून सुमारे 1220 मीटर उंचीवर आहे. जे त्याच्या भव्य इतिहास, प्राचीन पुरातत्व स्थळे आणि अद्भूत हवामानामुळे लोकप्रिय आहे.

जोग फॉल्स

जोग फॉल्स कर्नाटकात आहे. घनदाट जंगलात वसलेला हा धबधबा खूप सुंदर दिसतो. हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे आणि हे पाणी 829 फूट उंचीवरून कोसळते. या धबधब्याचा आवाज अनेक किलोमीटरवर ऐकू येतो. 

मुन्नार

केरळमधील सुंदर हिल स्टेशन मुन्नारला भेट द्यायची प्रत्येकाला इच्छा असते.  येथे तुम्ही इको पॉइंट, एरविकुलम नॅशनल पार्क आणि कुंडला लेक यांसारख्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. येथून जवळच मरायूरमधील डॉल्मेन आणि रॉक पेंटिंग्ज आणि चहाचे मळे आहेत. मुन्नारपासून 15 किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून 600 फूट उंचीवर प्रसिद्ध इको पॉइंट आहे. 

लॅन्सडाऊन

उत्तराखंडमधील लॅन्सडाऊन या अतिशय सुंदर हिल स्टेशनला तुम्ही नक्कीच भेट द्या. येथील निसर्गसौंदर्य खूपच पाहण्यासारखं आहे. लॅन्सडाऊनमध्ये तुम्ही ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करू शकता. येथे तुम्ही भुल्ला ताल पाहू शकता. हा तलाव अगदी लहान असून अतिशय शांत ठिकाणी वसलेला आहे. भारतीय लष्कर या तलावाचे रक्षण करतात.  

अधिक वाचा-  वजन कमी करण्यासाठी Best पर्याय 'ग्रीन कॉफी',  जाणून घ्या फायदे

नैनिताल

नैनिताल देशच नाही तर परदेशातूनही पर्यटक येतात. हे हिल स्टेशन जगभर प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात येथे पर्यटकांची वर्दळ असते. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि प्राणीसंग्रहालय पाहू शकता. नैनितालपासून 13 किमी अंतरावर पंगोटला जाता येतं. 

शिमला

शिमला हे जगातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या ठिकाणचे सौंदर्य पर्यटकांची मने जिंकते. पर्यटक शिमल्यातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकतात आणि खरेदीचा आनंदही घेऊ शकतात. मॉल रोडला जाता येते. पर्यटक शिमल्यातील जाखू हिल स्टेशनला भेट देऊ शकतात. जाखू टेकडी हे शिमलाचे सर्वात उंच ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 8000 फूट उंचीवर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी