Cricketer Mohammad Kaif : क्रिकेटच्या जगात मोहम्मद कैफचे नाव कोणाला माहिती नसेल असे लोक फारच कमी सापडतील. इंडियन क्रिकेट टीममध्ये मोहम्मद कैफने अनेक सामन्यांमध्ये आपली दमदार कामगिरी केली आहे. कैफ मूळचा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील आहे. त्याचे नोएडा येथील पत्रकार पूजा यादवसोबत लग्न झालं आहे. दोघांना दोन मुले असून कैफने आपल्या दोन्ही मुलांसाठी खूप सुंदर नावं निवडली आहेत. या बातमीत आम्ही तुम्हाला मोहम्मद कैफच्या मुलाचे नाव आणि त्याचा अर्थ सांगणार आहोत.
कैफ आणि त्याची पत्नी पूजा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैफच्या मुलाचा जन्म 28 फेब्रुवारी 2012 रोजी झाला असून कैफने आपल्या मुलाचे नाव कबीर ठेवले आहे. कबीर नावाचा अर्थ ताकदवान, महान आणि आदरणीय असा होतो. कबीर हे भारतातील सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 1440 मध्ये झाला आणि मृत्यू 1518 साली झाला आणि ते हिंदू, मुस्लीम, आणि शीख लोक त्यांचा आदर करत. याच संताच्या नावावरुन मोहम्मद कैफने आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांची नावं, अशी ठेवू शकता ज्याचा अर्थ ताकदवान आणि शक्तिशाली असेल.
जर तुमच्या मुलाचे नाव अ अक्षरापासून सुरू होत असेल तर, तुम्ही अमव हे नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ शक्तिशाली, ताकदवान आणि अपराजित असा आहे.
हे नाव सुध्दा मुलांसाठी चांगले आहे. अरिन नावाचा अर्थ आनंदाने भरपूर, पर्वत शक्ती, शांती आणि सूर्यकिरण असा होतो. अरिन हे नाव तुमच्या मुलाला शोभून दिसेल.
अधिक वाचा : नेक लाईनची कुर्ती घालून बाहेर पडाल तर दिसाल हिरोईन सारखे
जर द अक्षरापासून नाव शोधत असाल तर दैवत हे नाव आपल्या मुलाला ठेवू शकता. दैवत नावाचा अर्थ भाग्य आणि पराक्रमी आहे. दैवत हे नाव खूप यूनिक आहे आणि लोकंही या नावाला पसंती दर्शवत असतात.
प अक्षरावरून जर नाव ठेवायच असेल तर, पर्व हे नाव अगदी योग्य आहे. सण, मजबूत आणि पराक्रमी असा या नावाचा अर्थ होतो. आजच्या आधुनिक आणि अनोख्या नावांच्या जमान्यात पर्व या नावाला पसंती मिळत आहे.
अधिक वाचा : कमी तेलात अशी बनवा कुरकुरीत भजी
तुमच्या मुलाला नाव द्यायचे असेल आणि त हे अद्य अक्षर आले असेल तर त अक्षरावरून तक्षील हे सुंदर तुम्ही आपल्या मुलाला देऊ शकतात. मजबूत चारित्र्य असलेल्या व्यक्तीला तक्षिल म्हणतात. हे नाव तुमच्या मुलाला खूप शोभेल.
जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव पारंपारिक ठेवायचा विचार करत असाल तर विरांश हे नाव साजेसं आहे. हे नाव प्रेमळ असून महावीर स्वामी यांच्या अंशाला विरांश म्हणतात. तसेच याचा अर्थ ताकदवान आणि शक्तिशाली आहे.
व अक्षरापासून आपल्या मुलाला नाव द्यायचे असेल तर वृष हे ठेवा. या नावाचा अर्थ एक बलवान माणूस, भगवान शिवाचा बैल असा होतो.
]