Relationship Tips : तुमचा जोडीदार देणार नाही नकार, रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त ही गोष्ट

Relationship Tips : आपण अनेक चित्रपटात पाहिले असेल की एक हीरो हिरोईनला प्रपोज करण्यासाठी एका रोमँटिक डिनरला घेऊन जातो. हॉलिवूड असो वा बॉलिवूड या चित्रपटांमध्ये असे सीन असतात. परंतु ही फक्त काल्पनिक नसून यामागे एक शास्त्र आहे. एका संशोधनानंतर ही बाब समोर आली आहे. जर रात्री आपल्या जोडीदारासोबत शारिरीक संबंध एन्जॉय करायचे असेल तर आपल्या जोडीदारला उत्तम पदार्थ खाऊ घाला. शारिरीक संबंधापूर्वी भूक भागली असेल तर तुमचे खासगी क्षण आणखी रोमँटिक होतात.

relationship tips in marathi
तुमचा जोडीदार देणार नाही नकार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आपण अनेक चित्रपटात पाहिले असेल की एक हीरो हिरोईनला प्रपोज करण्यासाठी एका रोमँटिक डिनरला घेऊन जातो.
  • जर रात्री आपल्या जोडीदारासोबत शारिरीक संबंध एन्जॉय करायचे असेल तर आपल्या जोडीदारला उत्तम पदार्थ खाऊ घाला.
  • शारिरीक संबंधापूर्वी भूक भागली असेल तर तुमचे खासगी क्षण आणखी रोमँटिक होतात.

Relationship Tips : आपण अनेक चित्रपटात पाहिले असेल की एक हीरो हिरोईनला प्रपोज करण्यासाठी एका रोमँटिक डिनरला घेऊन जातो. हॉलिवूड असो वा बॉलिवूड या चित्रपटांमध्ये असे सीन असतात. परंतु ही फक्त काल्पनिक नसून यामागे एक शास्त्र आहे. एका संशोधनानंतर ही बाब समोर आली आहे. जर रात्री आपल्या जोडीदारासोबत शारिरीक संबंध एन्जॉय करायचे असेल तर आपल्या जोडीदारला उत्तम पदार्थ खाऊ घाला. शारिरीक संबंधापूर्वी भूक भागली असेल तर तुमचे खासगी क्षण आणखी रोमँटिक होतात. (your girlfriend never refuse to have physical relation follow this tips in marathi)

अधिक वाचा :  Relationship Tips : गर्लफ्रेंडशीच लग्न करण्याच्या विचारात असाल तर लक्षात घ्या या 5 गोष्टी 

कॅलिफोर्नियातील सॅन डियागो विद्यापीठात झालेल्या एका संशोधनानुसार जेव्हा महिलांचे पोट भरलेले असते तेव्हा त्या शारिरीक संबंधासाठी तयार असतात. आरोग्य विषयक मासिक एपेटाइटमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले होते. या संशोधनानुसार जर आपले पोट भरलेले असेल तर बक्षीस देण्यासाठी आपला मेंदू वेगवेगळे प्रकारचे सिग्नल सोडते. त्यामुळे महिला आपल्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवू पाहतात. 

अधिक वाचा : Relationship Tips: पुरुषांच्या ‘या’ सवयी जातात पार्टनरच्या डोक्यात, तुटू शकतं नातं

या संशोधनात 20 महिलांना 8 तासांसाठी उपाशी ठेवण्यात आले होते. आठ तासानंतर काही सामान्य आणि रोमँटिक छायाचित्रे दाखवण्यात आले होते, परंतु त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. जेव्हा त्यांना 500 कॅलरी असलेले सप्लिमेंट ड्रिंक देण्यात आले तेव्हा ही छायाचित्रे त्यांना पुन्हा दाखवण्यात आले. तेव्हा त्यांच्या मेंदूने रोमँटिक छायाचित्रांना अधिक प्रतिक्रिया दिली. 

अधिक वाचा : Relationship Tips: घरी कांदे पोहेचा कार्यक्रम आहे; मग करा ही चार कामे , लगेच धराल लग्नाची तारीख

जेव्हा तुम्ही उपाशी असतात किंवा गरजेचेपेक्षा जास्त खाता तेव्हा या दोन्ही अवस्थेत तुम्हाला अवघडल्यासारखं होत. हेच जेव्हा तुमचे पोट भरलेले असते तेव्हा तुम्ही प्रणयासाठी उत्सुक असता असे संशोधनातून समोर आले आहे. जर तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक रात्र घालवायची असेल तर त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घाला.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी