तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत डेट तर करत नाहीत ना? या पाच मुद्द्यांनी सहज समजेल

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 29, 2022 | 18:31 IST

जोडीदाराची (Spouse) निवड करताना तर नेहमी सावधन असणं गरजेचं असतं. अनेकदा लग्नानंतर (marriage) आपण चुकीच्या व्यक्तीच्या सोबत असल्याची जाणीव होते. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. प्रत्येक नात्यात आपण भावनिक गुंततो. अशावेळी थोडी तडजोड ही करावीच लागते. पण योग्य व्यक्तीची निवड करणं हे भविष्याच्या (future) दृष्टीकोनातून गरजेचं आहे.

You're dating the wrong person, aren't you?
तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत डेट तर करत नाहीत ना?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रेम ही हृदयाशी निगडीत असलं तरीही यामध्ये मेंदूचा देखील सहभाग असणं गरजेचं आहे.
  • जोडीदारासोबत आपल्याला सुरक्षित वाटणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
  • पुरूष कायम बोलताना आपलं पुरूषत्व मांडत असतो.

नवी दिल्ली : जोडीदाराची (Spouse) निवड करताना तर नेहमी सावधन असणं गरजेचं असतं. अनेकदा लग्नानंतर (marriage) आपण चुकीच्या व्यक्तीच्या सोबत असल्याची जाणीव होते. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. प्रत्येक नात्यात आपण भावनिक गुंततो. अशावेळी थोडी तडजोड ही करावीच लागते. पण योग्य व्यक्तीची निवड करणं हे भविष्याच्या (future) दृष्टीकोनातून गरजेचं आहे. जर तुम्ही जर प्रेमविवाह (Love marriage) करायचा विचार करत असाल आणि त्यासाठी तुम्ही कोणाला डेट करत असेल तर काही गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे. 

प्रेम ही हृदयाशी निगडीत असलं तरीही यामध्ये मेंदूचा देखील सहभाग असणं गरजेचं आहे. आपल्या पार्टनरचा स्वभाव कसा आहे, तो अडचणींच्या वेळात कसा वागतो. यावर लक्ष ठेवा. यामुळे खालील स्वभाव तुमच्या पार्टनरचा असेल तर समजा तुम्ही चुकीच्या व्यक्तीला डेट करताय.

तुमचा आदर न करणे

तुमचा जोडीदार तुमच्याशी आदराने वागत नसेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. भविष्यात हे नातं तुम्हाला किती आदरपूर्वक वागणूक देईल याबाबत जरा शंकाच आहे. विचारांमध्ये तफावत असणे यात काही मोठी गोष्ट नाही. मात्र मतभेद असताना अनादर करणे ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. कितीही मतभेद असले तरीही जोडीदाराच्या मतांचा सन्मान करणं अत्यंत गरजेचं आहे. 

तुमच्या सुरक्षेचा विचार न करणे

जोडीदारासोबत आपल्याला सुरक्षित वाटणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तसेच प्रत्येकाने स्वावलंबी असावं. स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. मात्र तुमची काळजी घेणं हे तुमच्या जोडीदाराला जबाबदारी वाटण महत्वाचं आहे. 

जोडीदार रागीष्ट असणे

राग हा प्रत्येकाला असतो आणि तो असायलाच हवा. पण त्या रागाचा परिणाम कुठपर्यंत होतो, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे. आणि रागाच्या भरात काही तरी करून बसणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. 

तुमचं मत विचारात घेत नाही

कोणत्याही नात्यात समोरच्या व्यक्तीचं मत विचारात घेणं अत्यंत गरजेचं असतं. मग तो कोणताही मुद्दा असो किंवा कोणतीही खासगी 

​प्रत्येक बोलण्यात पुरूषत्व येणं

पुरूष कायम बोलताना आपलं पुरूषत्व मांडत असतो. अगदी तसंच काहीस जर तुमच्या नात्यात असेल तर आताच थांबा. जेवणात आपल्याच आवडीचा पदार्थ असावा हा हट्ट असणे, आपल्याच मताचा विचार केला पाहिजे. मी बोलतो तेच खरं आणि तसंच झालं पाहिजे, अशा व्यक्तीसोबत संसार करणं खूप कठीण होऊ शकतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी