तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सातार्यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता अण्णा भाऊ साठे यांचे फार शिक्षण झाले नव्हते. तरी त्यांनी ३५ कादंबर्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत. अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते.