निस्सीम श्रद्धा आणिक ठेवून शुद्ध अंतःकरण ||
मनापासून माथा टेकवावा अन् धरावे बाबांचे चरण ।
भक्तांच्या कल्याणा करिता शेगावीचा राणा समर्थ...
फक्त अनन्यभावे जावे सदगुरु माऊलीला शरण ॥
निस्सीम श्रद्धा आणिक ठेवून शुद्ध अंतःकरण ||
मनापासून माथा टेकवावा अन् धरावे बाबांचे चरण ।
भक्तांच्या कल्याणा करिता शेगावीचा राणा समर्थ...
फक्त अनन्यभावे जावे सदगुरु माऊलीला शरण ॥
माझ्या हृदयात ठसावे,
श्री गजानन नाम ॥
माझ्या कार्यात वसावे,
श्री गजानन नाम ॥
दुःख असो कि असो
सुख जिवनात.....
माझ्या मुखी असावे,
श्री गजानन नाम।।
गण गण गणात बोते हे जे भजन प्रिय गुरुवरा ॥
जोडोनी दोन्ही हात नित्य प्रातः काली स्मरा ॥
प्रामाणिक निष्ठा, सचोटीने मग कर्मे आपली करा ॥
सन्मानाने जगण्या करिता मार्ग कर्म भक्तीचा हा खरा ॥
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,
जिथे योग्य विध्येस समर्थ येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…
नित्य असावी ध्यानीमनी,
बावन्न गुरुवारा नम..
करा पाठ बहु भक्तीने,
विघ्ने सारी पळती दूर.