आज गोवा राज्य दिन आहे. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला होता, परंतु स्वातंत्र्याची पहाट गोव्यात झालीच नव्हती. अखेर भारत सरकारने सैन्य घुसवून पोर्तुगीजांच्या तावडीतून गोव्याची मुक्तता केली. गोवा हे स्वायत्त राज्य ३० मे १९८७ रोजी अस्तित्वात आले. आज गोव्याचा ३४ वा राज्य दिन आहे. या निमित्ताने मराठीत शुभेच्छा शेअर करा.