दरवर्षी 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. हा दिवस अशा बलिदान देणाऱ्यांना समर्पित आहे ज्यांनी आपले रक्त सांडून या देशाची सुरक्षा केली.
दरवर्षी 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. हा दिवस अशा बलिदान देणाऱ्यांना समर्पित आहे ज्यांनी आपले रक्त सांडून या देशाची सुरक्षा केली.
हा दिवस 1972 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सुरू केला होता.
हा दिवस एक आठवडा अभियान म्हणून साजरा केला जातो आणि या मोहिमेद्वारे विविध चर्चासत्रे, पोस्टर्स, कार्यक्रम, स्पर्धांच्या मदतीने लोकांना सुरक्षिततेबद्दल जागरूक केले जाते.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा दिवस एक दिवसासाठी नसून संपूर्ण आठवडा म्हणजेच 4 मार्च ते 10 मार्च पर्यंत साजरा केला जातो.
4 मार्च 1966 रोजी, नॅशनल सेफ्टी कौन्सिल ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून अनेक औद्योगिक, खाजगी, सरकारी कार्यालये, कारखान्यांच्या ठिकाणी साजरा केला जातो.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यामागे एकमेव उद्देश हा आहे की, काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा तसेच आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेविषयी जागरूक करणे.