दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जगात कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी संपलेले नाही. जगात तापमानवाढ होत असून अनेक ठिकाणी वातवरण बदलाचा फटका बसत आहे. अशा वेळी पर्यावरणाचे महत्त्व आणखी गडद होत आहे. आज पर्यावरण दिनानिमित्त आपण किमान एक झाड लावायचा संकल्प करूया. तसेच आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा देऊया.