मुंबई : Gadge Maharaj Death Anniversary images : संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा (Gadge Maharaj) हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. अशा या थोर कीर्तनकार, संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेच्या पूजाऱ्याची आज (20 डिसेंबर) 66 वी पुण्यतिथी.