संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकारामांनी गायलेल्या अभंगांचे लेखन केलं. संताजी हे जातीने तेली होते. त्यांना 'संतु तेली' म्हणूनही ओळखले जाते असे. श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चाकण गावात झाला. त्यांचा जन्म जगनाडे कुटुंबात श्री विठोबा पंत आणि मथुबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या घरातील वातावरण अध्यात्मिक आणि धार्मिक होते.