Shivrajyabhishek Din : आज ६ जून. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याला खर्या अर्थाने सुरू झाली. नंतर याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला. आजचा दिवस महाराष्ट्र राज्य शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करत आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटात हा दिन साजरा केला जात होता. परंतु आता कोरोनाचे संकट कमी झाले असून रायगडावर राज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे.