विनायाक दामोदर सावरकर हे प्रखर हिंदुत्त्ववादी होते. त्यांना 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक आणि पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.
विनायाक दामोदर सावरकर हे प्रखर हिंदुत्त्ववादी होते. त्यांना 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक आणि पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.
लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेताना जोसेफ मॅझिनी या इटालियन विचारवंताच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर सावरकरांनी केले. भाषांतराला सावरकरांनी दिलेली प्रस्तावना भारतीयांसाठी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान ठरली. त्या काळी अनेक क्रांतीकारकांना ही प्रस्तावना पाठ होती.
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले म्हणून सावरकर यांची बॅरिस्टर पदवी काढून घेण्यात आली.
भाषाशुद्धीकरणासाठी सावरकरांनी मोठे काम केले. मराठी भाषेला दिनांक, महापौर असे 45 मराठी शब्द त्यांनी दिले.
विनायक दामोदर सावरकर यांनी 83व्या वर्षी 1 फेब्रुवारी 1966 पासून अन्न, औषध, पाणी या सर्वांचा त्याग केला. हळूहळू त्यांची प्रकृती खालावली आणि 26 फेब्रुवारी 1966 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला.