Banana chips Recipe: घरच्या घरी बनवा केळ्याचे वेफर्स, पाहा VIDEO 

Banana chips: केळ्याचे वेफर्स हा तसा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. तसा हा पदार्थ बनवणं देखील फार सोपा आहे. पाहा केळ्याचे वेफर्स कसे बनवायचे त्याचा खास व्हिडिओ 

banana chips
केळ्याचे वेफर्स  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: खरं केळं हे फळ असं आहे की, जे वर्षभर उपलब्ध असतं. तसंच केळं खाण्याचे बरेच फायदे देखील आहेत. कच्चं केळं हे देखील खूप फायदेशीर मानलं जातं. आजवर आपण केळ्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण केळ्याचे वेफर्स (Banana chips) हा जवळपास सर्वांचाच आवडता पदार्थ (Recipe) आहे. त्यामुळे तो लोकप्रिय देखील आहे. हा पदार्थ एवढा सोप्पा आहे की, आपण घरी देखील तो सहजपणे बनवू शकता. 

यासाठी तुम्हाला तीन ते चार कच्ची मोठी केळी घ्यावी लागतील. सुरुवातीला ही केळी सोलून ठेवा. नंतर एका भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ आणि थोडी हळद टाका. त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण मिक्स करुन घ्या. दुसरीकडे गॅसवर कढईत तेल गरम करुन घ्या. तेल चांगले उकळले की, चिपिंग कटरच्या सहाय्याने कच्च्या केळाच्या काप थेट तेलात टाकून फ्राय करा. थोड्या वेळाने त्यात मीठ आणि हळदीचं पाणी घाला. यावेळी तेल उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाणी टाकताना थोडं सांभाळून टाकावं. तेल उडणं बंद झालं की, गॅस बंद करा. . तेलाचे तापमान कमी करण्यासाठी आणि वेफर्स कुरकुरीत होण्यासाठी मीठ पाणी त्यात टाकले जाते. वेफर्स पूर्णपणे तळून झाल्यानंतर ते चाळणीमध्ये काढून घ्या. त्यामुळे त्यामधील तेल पूर्णपणे निघून जाईल. नंतर हे वेफर्स काही वेळ टिश्यू पेपरवर ठेवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी