Egg Malai Masala: रेस्टॉरंट स्टाईलमध्ये घरीच बनवा 'अंडी मलाई मसाला', जाणून घ्या सोपी रेसिपी

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 23, 2022 | 13:59 IST

Egg Malai Masala Recipe: जर तुम्हाला नवीन स्टाईलमध्ये अंड खायचे असेल तर तुम्ही घरच्या घरी एग मलाई मसाला नक्की ट्राय करा. रेस्टॉरंट स्टाईलमध्ये अंडा मलाई मसाला घरी बनवण्याची ही सोपी रेसिपी आहे.

Egg Malai Masala Recipe
अंडा मलाई मसाला रेसिपी 
थोडं पण कामाचं
  • नवीन स्टाईलमध्ये अंड खायचे असेल तर तुम्ही घरच्या घरी एग मलाई मसाला नक्की ट्राय करा.
  • रेस्टॉरंट स्टाईलमध्ये अंडा मलाई मसाला घरी बनवण्याची ही सोपी रेसिपी आहे.
  • अंड्याची ही नवीन रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

मुंबई:  Egg Malai Masala Easy Recipe In Marathi: जर तुम्हाला नवीन स्टाईलमध्ये (New style)  अंड खायचे असेल तर तुम्ही घरच्या घरी एग मलाई मसाला (Egg Malai Masala) नक्की ट्राय करा. अंडी मलाई मसाला बनवण्यासाठी प्रथम अंडी उकळवा आणि थंड झाल्यावर त्यांची साल काढून टाका. आता त्यांना मध्यभागी कापून घ्या.

मिक्सर ग्राइंडरमध्ये कांदा आणि मिरची बारीक करून घ्या, नंतर पॅन गरम केल्यानंतर त्यात तेल घाला आणि कांद्याची पेस्ट शिजवा. थोड्या वेळानं आले लसूण पेस्ट घालून चांगले शिजवून घ्या. 

अधिक वाचा- Soft केसांसाठी वापरा काकडीचा मास्क, असा बनवा

आता त्यात एक कप दूध घालून मिक्स करा. नंतर त्यात काळी मिरी पावडर, जिरेपूड आणि सर्व मसाले घाला. चवीनुसार मीठ घाला आणि चांगले मिसळा. त्यानंतर त्यात अंडी घालून शिजवून घ्या. 2 मिनिटांनी गॅस बंद करून सर्व्ह करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी