Happy Buddha Purnima 2021 Marathi Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी Messages, Greetings

लाइफफंडा
Updated May 26, 2021 | 12:32 IST

Happy Buddha Purnima 2021 Marathi Wishes: बौद्ध धर्मियांसह जगभरातील गौतम बुद्धांच्या अनुयायांना बुद्ध जयंती निमित्त शुभेच्छा देणारी मराठमोळी शुभेच्छापत्र,Wishes, Messages आणि ग्रिटिंग्स!

थोडं पण कामाचं

  • भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला.
  • बौद्ध धर्मीयांसाठी वैशाख पौर्णिमेचा (Vaishakh Purnima) दिवस हा खास असतो
  • बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण दोन्ही वैशाख पौर्णिमेदिवशीच झालं असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे

Buddha Jayanti 2021 Wishes: भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर करणारे आजही शांततेचा मार्ग निवडतात. बौद्ध धर्मीयांसाठी वैशाख पौर्णिमेचा (Vaishakh Purnima) दिवस हा खास असतो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण दोन्ही वैशाख पौर्णिमेदिवशीच झालं असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. यंदा बुद्ध जयंती (Buddha Jayanti) हा दिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, बौद्ध पौर्णिमा 26 मे दिवशी आहे. जगाला दया, क्षमा, शांती आणि संयमाची शिकवण देणारे गौतम बुद्ध (Gautam Buddha) आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांची शिकवण आज जगाला कठीण काळातही सामना करण्यासाठी बळ देते. मग यंदा बुद्ध पौर्णिमेदिवशी गौतम बुद्ध यांचे स्मरण करून तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स, मेसेज, Wishes, HD Images शेअर करून त्यांच्या विचारांना आजच्या दिवशी पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू या! 

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य म्हणून ओळखला जातो. गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधीवृक्ष’म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणून देखील ओळखले जाते.


बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा

buddha Purnima marathi Message

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे

दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे

विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती

निमित्त हार्दिक शुभेच्छा 

buddha Purnima marathi Message
विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणार्‍या

भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!

buddha Purnima marathi Message

तीन वस्तू जास्त वेळ लपू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य... गौतम बुद्ध 

buddha Purnima marathi Message

नमो बुद्धाय !बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

buddha Purnima marathi Message
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

buddha Purnima marathi Message
बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती आणि समाधान घेऊन येवो हीच आमची प्रार्थना...

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

भारताप्रमाणेच बौद्ध धर्माची शिकवण आणि संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया या देशांमध्ये पाळली जाते. गौतम बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सामान्यांपर्यंत पोहचवले. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्यं, अष्टांग मार्ग व पंचशीले जगाला दिली आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी