Homemade Strawberry Cake Recipe How to Make Strawberry Cake at home : नववर्षाच्या पार्टीसाठी घरगुती स्ट्रॉबेरी केक तयार करणे अतिशय सोपे आहे. घरगुती स्ट्रॉबेरी केक आपण फक्त नववर्षाच्या पार्टीसाठीच नाही तर इतर पार्टी, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अशा कोणत्याही प्रसंगाला साजरे करण्यासाठी तयार करू शकता. स्ट्रॉबेरी केकचा गोडवा सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करेल. स्ट्रॉबेरी केकमध्ये मर्यादीत कॅलरी असतात. पण व्हिप क्रीमचा मोठा लेयर लावला अथवा गोडवा वाढवण्यासाठी जॅमचा वापर केला तर कॅलरी वाढू शकतात. जाणून घ्या घरगुती स्ट्रॉबेरी केक तयार करण्याची सोपी पद्धत....
Diwali 2021: या मिठाई प्रेशर कुकरमध्येही बनवता येतात, जाणून घ्या सोपी रेसिपी
२ कप मैदा
२ कप स्ट्रॉबेरी
१ कप फेटलेले क्रीम
१ कप साखरेची पूड
अर्धा कप स्ट्रॉबेरी क्रश
अर्धा कप दूध
अर्धा कप बटर (अमूल बटर)
१ टी स्पून बेकिंग पावडर
१ टी स्पून व्हॅनिला पावडर
अर्धा टी स्पून स्ट्रॉबेरी इसेंस