मुंबईः दीपावली हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण... कापणी झाली असते, शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्याच्या हाती चार पैसे आले असतात. थंडीची सुरुवात झाली असते. अशा सुखद वातावरणात निश्चिंत मनाने बळीराजासह संपूर्ण समाज आनंद साजरा करण्यास सज्ज असतो.... सर्वात मोठा भारतीय सणांचा सोहळा असलेल्या या दीपावलील फराळ, गोडधोडाचे पदार्थ यांची रेलचेल असते. घरोघरी जिभेचे चोचले पुरवणारे स्वादीष्ट पदार्थ तयार केले जातात.
दीपावलीच्या आनंददायी सोहळ्यात मोतीचुराचे लाडू हा चविष्ट पदार्थ खाण्याची गंमतच न्यारी. मोतीचुराचे लाडू खात आणि गरमागरम दूध पित दिवाळी साजरी करणारे खाद्यप्रेमी भारतात मोठ्या संख्येने आहेत. ज्यांना दूध आवडत नाही पण गोड खायला आवडते अशी मंडळी फक्त मोतीचुराच्या लाडूचा आनंद लुटतात. तर असा हा चविष्ट पदार्थ तयार करण्याची खास पद्धत आहे.
यंदा कोरोना संकटात कोविड प्रोटोकॉलचे पालन करत दीपावली साजरी केली जात आहे. या वर्षी गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी वसुबारस पासून दीपावलीची सुरुवात झाली. उद्या म्हणजेच १४ नोव्हेंबरच्या शनिवारी लक्ष्मीपूजन होणार आहे. हा मंगलप्रसंग साजरा करण्यासाठी मोतीचुराचे लाडू असतील तर आणखी मजा येईल. चल तर मग जाणून घेऊ कसे करतात मोतीचुराचे लाडू. नव्या पिढीतील अनेकांना त्यांच्या धावपळीच्या जीवनामुळे दीपावलीचा फराळ करणे जमत नाही ही मंडळी रेडीमेड फराळ आणून घरी पदार्थ खाण्याचा आनंद लुटतात. पण ज्यांना हौसेने एखादा पदार्थ करुन बघायचा आहे अशांनी मोतीचुराचे लाडू करुन बघायला काय हरकत आहे? पहिल्यांदाच मोतीचुराचे लाडू करत असलेल्या हौशी मंडळींच्या सोयीसाठी 'टाइम्स नाऊ मराठी' (timesnowmarathi.com) आज स्वादीष्ट मोतीचुराच्या लाडूची रेसिपी सांगणार आहे. (How to make Diwali special recipe Motichoor Laddu at home Video)
तीन वाटी तूप, दोन वाटी बेसन, आवश्यकतेनुसार पाणी, एक वाटी साखर, एक वाटी साखर पाक तयार करण्यासाठी, एक वाटी पाणी पाक तयार करण्यासाठी, किमान सात ते आठ वेलची अथवा वेलची पूड, केशर अथवा खाण्याचा रंग