अशी तयार करा मखाणा बर्फी

Makhana Barfi Recipe मखाणा बर्फी हा चविष्ट आणि फिटनेसची काळजी घेणारा पदार्थ तयार करण्याची कृती...

Makhana Barfi Recipe
मखाणा बर्फी 

थोडं पण कामाचं

 • अशी तयार करा मखाणा बर्फी
 • मखाणा बर्फी एक चविष्ट आणि फिटनेसची काळजी घेणारा पदार्थ
 • शरीराचा थकवा दूर करण्याची क्षमता असलेला पदार्थ

नवी दिल्लीः चवदार पदार्थ तयार करणे आणि ते खाणे, पदार्थांविषयी गप्पा मारणे हे कोणाला आवडत नाही? पदार्थ तयार करत नसणाऱ्यांनाही पदार्थांविषयी गप्पा मारायला हमखास आवडतात. भारतीय माणसं तर गप्पीष्ट आणि चवदार आवडीने खाणारी खाद्यप्रेमी म्हणून ओळखली जातात. आपल्या देशात काही वर्षांपूर्वीपर्यंत लग्न समारंभांमध्ये गोड पदार्थ खाण्याच्या स्पर्धा रंगायच्या. पण जागतिकीकरण झाले आणि एका जागेवर बसून काम करण्याचे प्रमाण वाढले. अंग मेहनतीची कामं कमी झाली. यंत्रांची मदत घ्यायला सुरुवात झाली आणि पोटाचा घेर वाढण्याची गंभीर समस्या सुरू झाली. मग फिटनेस, डाएट यांना प्राधान्य आले आणि खाण्याच्या स्पर्धा मागे पडल्या. या स्पर्धा मागे पडल्या तरी चवदार पदार्थ करणे आणि चवीने खाणे काही थांबले नाही. हल्ली तर दिवसभरात थोडं थोडं खा, संध्याकाळी लाइट स्नॅक्स घ्या असे डाएटचे सल्ले देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढत असल्यामुळे वजन नियंत्रणात राखणाऱ्या पदार्थांना महत्त्व आले आहे. आज असाच एक पदार्थ तयार करायचा आहे. हा पदार्थ चविष्ट आहे, फिटनेसची काळजी करणारेही खाऊ शकतील असा आहे. मग चला तर हा पदार्थ तयार करायला घेऊ....

Tasty And Delicious Makhana Barfi Recipe: मखाणा बर्फी...

एक टेस्टी, हेल्दी आणि डीलिशिअस पदार्थ. चविष्ट आणि फिटनेसची काळजी घेणारा पदार्थ.

साहित्य  -

मखाणा १०० ग्रॅम, काजू १०, २ चमटे टरबुजाच्या बिया, २ चमचे तूप, दीड ते दोन कप गूळ, १ चमदा वेलची पावडर.

कृती - 

 1. मखाणा पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्या
 2. मखाणा भाजून झाल्यावर टरबुजाच्या बिया तसेच काजू हे दोन्ही मागोमाग स्वतंत्रपणे भाजून घ्या
 3. मिक्सरमध्ये मखाणा टाकून त्याची पावडर तयार करुन घ्या, ही पावडर एका भांड्यात घ्या त्यावर टरबुजाच्या बिया आणि काजू हे दोन्ही टाका आणि चमच्याने ढवळून मिक्स करा
 4. पॅनमध्ये तूप सोडा आणि त्यावर गूळ भाजून घ्या
 5. गूळ पूर्ण वितळला आणि तुपात मिसळला की मखाणाच्या मिक्स पावडरमध्ये टाका, नंतर चमच्याने ढवळून मिक्स करा
 6. तयार झालेल्या मिश्रणावर थोडे तूप घालून चमच्याने ढवळून घ्या 
 7. एका ताटलीत बटर पेपर ठेवा, या पेपरवर मिश्रण ओतून पसरवा आणि थंड करत ठेवा
 8. मिश्रण थंड झाल्यावर हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्या
 9. ही मखाणा बर्फी डिशमध्ये व्यवस्थित मांडून आणि सजवून खाण्यासाठी सज्ज करा

मखाणा बर्फी खाण्याचे फायदे

 1. फिटनेसची काळजी करणाऱ्यांसाठी तसेच फिटनेसची चिंता न करणाऱ्यांसाठी मखाणा बर्फी हा चविष्ट आणि उत्तम पदार्थ
 2. गोड म्हणून अथवा सहज तोंडात टाकण्यासाठी म्हणून बेस्ट पर्याय
 3. शरीराचा थकवा दूर करण्याची क्षमता असलेला पदार्थ
 4. मखाणा हृदय आणि किडनीसाठी लाभदायी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी