[VIDEO] सिक्स पॅक अॅब्स बनवायचे असल्यास हे योगासन नक्की पाहा! 

लाइफफंडा
रोहित गोळे
Updated Jul 14, 2019 | 18:06 IST

Six pack abs from Yoga: जर आपण सुटलेल्या पोटामुळे त्रस्त असाल तर आपण उत्तानपादासन जरुर करा. कारण यामुळे आपल्या पोटाच्या समस्या नाहीशा होऊन आपण चक्क सिक्स पॅक अॅब्सही करु शकता.

 yoga_77
[VIDEO] सिक्स पॅक अॅब्स बनवायचे असल्यास हे योगासन नक्की पाहा!  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सिक्स पॅक्स अॅबसाठी उपयुक्त योगासन
  • उत्तानपादासनाचे अनेक फायदे, सिक्स पॅक्स अॅबसाठी सर्वात फायदेशीर
  • वेगवेगळे योग आसन शिका डॉ. अमृत राज यांच्याकडून

नवी दिल्ली: जगभरात नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. याच निमित्ताने आम्ही आपल्यासाठी योगासनाचे नवनवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये योगगुरु डॉ. अमृत राज हे वेगवेगळ्या प्रकारचे योगासनाबाबत आपल्याला माहिती देतील. तसेच या योग आसनांमुळे आपल्या शरीराला नेमके काय फायदे आहेत हे देखील ते स्पष्ट करतात. नेमके योग आसन कसे करावे हे देखील व्हिडिओमध्ये आपल्याला अमृत राज स्वत: शास्त्रोक्त पद्धतीने करुन दाखवतील. 

सेतुबंध आसन

या व्हिडिओमध्ये डॉ. अमृत राज हे आपल्याला काही खास योगासनं शिकवणार आहेत. यामध्ये त्यांनी सुरुवातीला सेतुबंध आसन म्हणजेच ब्रिज पोझबाबत सांगणार आहेत. हे आसन नेमकं कसं करावं याबाबत देखील सांगण्यात आलं आहे. हे आसन नियमित केल्याने डिप्रेशन, चिंता यासारख्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. पोटातील गॅसेस कमी करण्यासाठी देखील हे आसन अतिशय लाभदायक आहे. 

उत्तानपादासन

यानंतर डॉ. अमृत राज हे सिक्स पॅक्स अॅब्स बनविण्यासाठी एका खास आसनाबाबत माहिती देतात. हे आसन आहे उत्तानपादासन. वाढत्या वयानुसार पोटाचा घेर देखील वाढतो. अनेकांना तरुणपणातच ही समस्या उद्भवते. त्यावेळी प्रत्येकालाच वाटतं की, आपले देखील अॅब्स असावेत. त्यामुळे आता हे योग आसन आपल्यासाठी फारच महत्त्वाचं ठरू शकतं. या आसनाचे इतरही फायदे आहेत. ज्यामुळे आपल्या पोटाच्या समस्या दूर होती. तसेच पोटाचे स्नायू बळकट होती. तसंच पोटातील गॅसेस देखील कमी होतील. 

अर्धहलासन/पवनमुक्तासन 

उत्तानपादासनानंतर डॉ. अमृत राज हे अर्धहलासन विषयी आपल्याला माहिती देतील. या आसनाचा मुख्य फायदा हा मधुमेह असणाऱ्यांना खूप उपयोगी ठरु शकतो. या आसनामुळे रक्तातील शुगर कमी होण्यास मदत होईल. या आसनामुळे देखील आपल्या पोटाचे स्नायू बळकट होतील. यानंतर डॉ. अमृत राज हे पवनमुक्तासन या आसनाबद्दल सांगतील. या आसनाचे अनेक फायदे आहेत. या आसनामुळे आपल्याला मुख्यत्वे अॅसिडिटी कमी करण्यास फायदा होईल. याशिवाय पोटाचे स्नायू मजबूत होतील.  

शवासन

सगळ्यात शेवटी अमृत राज हे शवासनाबाबत माहिती देतात. दररोज आपण बरेच तणावात असतो. अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रासही असतो. कुणाला आपला राग आवरता येत नाही. या सगळ्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी शवासन हा रामबाण उपाय आहे. या आसनामुळे शरीराला एका वेगळ्याच प्रकारची उर्जा मिळते. 

दररोज योगा करणं ही एक अतिशय उत्तम सवय होऊ शकते. यामुळे आपला शारीरिक व्यायाम तर होतोच. पण एक प्रकारचं मानसिक समाधान देखील आपल्याला मिळतं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी