Uric Acid चा त्रास असलेल्यांसाठी विषासमान असलेले १० पदार्थ

10 Food That Can Increases Uric Acid Avoid These Foods In Your Diet To Control Uric Acid : विशिष्ट पदार्थांच्या खाण्यापिण्याने शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. शरीरातील युरिक अॅसिडमध्ये अतिरेकी वाढ होऊ लागली तर तब्येत ढासळण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे युरिक अॅसिडचे शरीरातील प्रमाण नियंत्रित  करणे आवश्यक आहे.

10 Food That Can Increases Uric Acid Avoid These Foods In Your Diet To Control Uric Acid
Uric Acid चा त्रास असलेल्यांसाठी विषासमान असलेले १० पदार्थ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Uric Acid चा त्रास असलेल्यांसाठी विषासमान असलेले १० पदार्थ
 • युरिक अॅसिडमध्ये अतिरेकी वाढ होऊ लागली तर तब्येत ढासळण्याचा धोका
 • युरिक अॅसिडचे शरीरातील प्रमाण नियंत्रित  करणे आवश्यक

10 Food That Can Increases Uric Acid Avoid These Foods In Your Diet To Control Uric Acid : युरिक अॅसिड एक पदार्थ आहे. हा पदार्थ शरीरात प्युरिन नावाच्या पदार्थाच्या विघटनाने निर्माण होतो. विशिष्ट पदार्थांच्या खाण्यापिण्याने शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. मटणातील यकृत (लिव्हर), कडधान्य, मटार, अल्कोहोल मिश्रीत मद्य यांच्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

बरेचसे युरिक अॅसिड रक्तात मिसळते आणि लघवीद्वारे शरीराबाहेर फेकले जाते. पण शरीरातील युरिक अॅसिडमध्ये अतिरेकी वाढ होऊ लागली तर तब्येत ढासळण्याचा धोका निर्माण होतो. शरीरात मूतखडे निर्माण होण्याचा तसेच सांधेदुखीचा त्रास होण्याचाही धोका असतो. काही वेळा शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गाठी निर्माणा होण्याचाही धोका असतो. अतिरिक्त युरिक अॅसिडमुळे सांधेदुखी झाल्यास प्रचंड त्रास होतो. यामुळे युरिक अॅसिडचे शरीरातील प्रमाण नियंत्रित  करणे आवश्यक आहे.

युरिक अॅसिडचा त्रास होऊ नये म्हणून हे खाऊ नका...

 1. साखर, फ्रुक्टोज, मैदा यांच्यापासून तयार केलेले पदार्थ, फास्टफूड आणि जंकफूड खाऊ नका
 2. कृत्रिम सरबतं, शीतपेयं, आईस्क्रीम, रेडी टू ईट फूड, पाकिटबंद पदार्थ खाऊ नका
 3. रात्री झोपण्याआधी दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ यांचे सेवन टाळा
 4. अल्कोहोल, कोणत्याही प्रकारचे मद्य, अंमली पदार्थ, गुटखा, मावा, तंबाखू, यांचे सेवन टाळा तसेच धूम्रपान करणेही टाळा
 5. मांसाहार करणे टाळा, पाकिटबंद मांस खाणे टाळा
 6. कडधान्य, पनीर, राजमा, तांदुळ खाणे टाळा
 7. आंबट फळे खाणे टाळा
 8. लिंबू सरबत तसेच सर्व आंबट पेय टाळा
 9. मनुका खाणे टाळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी