हिवाळ्यात फिटनेस जपण्यासाठी खायचे १५ पदार्थ

15 foods to eat to maintain fitness in winter हिवाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये फिटनेस जपण्यासाठी १५ पदार्थ खाऊ शकता.

15 foods to eat to maintain fitness in winter
हिवाळ्यात फिटनेस जपण्यासाठी खायचे १५ पदार्थ 
थोडं पण कामाचं
 • हिवाळ्यात फिटनेस जपण्यासाठी खायचे १५ पदार्थ
 • तज्ज्ञांनी सुचवलेल्या पदार्थांपैकी निवडक पदार्थ आलटून पालटून मर्यादीत प्रमाणात खाऊ शकता
 • अॅलर्जी असेल अथवा वैद्यकीय कारणामुळे एखादा पदार्थ खाण्यास डॉक्टरांनी मनाई केली असेल तर संबंधित पदार्थ वर्ज्य करा

15 foods to eat to maintain fitness in winter नवी दिल्ली: हिवाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये फिटनेस जपण्यासाठी १५ पदार्थ खाऊ शकता. या १५ पदार्थांपैकी आपल्या सोयीनुसार निवडक पदार्थ मर्यादीत प्रमाणात खाऊ शकता. तोचतोचपणा टाळण्यासाठी दररोज तज्ज्ञांनी सुचवलेल्या पदार्थांपैकी निवडक पदार्थ आलटून पालटून मर्यादीत प्रमाणात खाऊ शकता. यादीतील एखाद्या पदार्थाची अॅलर्जी असेल अथवा वैद्यकीय कारणामुळे तो पदार्थ खाण्यास डॉक्टरांनी मनाई केली असेल तर संबंधित पदार्थ वर्ज्य करा.

 1. खसखस - दिवसातून एकदा, शक्यतो सकाळी एक चमचा खसखस दुधातून घेऊ शकता. अथवा पाणी किंवा दुधात भिजवलेले एक-दोन चमचे खसखस चावून खाऊ शकता. नाश्ता म्हणून खसखस-बदाम हलवा पण खाऊ शकता. खसखस मेंदू कार्यक्षम करते आणि शरीराला दैनंदिन कामासाठी ऊर्जा पुरवते.
 2. काजू - मर्यादीत प्रमाणात काजू खाऊन शरीराला दैनंदिन कामासाठी ऊर्जा मिळवून देऊ शकता. मर्यादीत प्रमाणात गोड पदार्थ खाणार असाल तर त्या पदार्थात काजू घालू शकता. काजूमुळे वजन वाढते त्यामुळे ते मर्यादीत प्रमाणातच खावे.
 3. बदाम - रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी चावून खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळवण्यास मदत होऊ शकते. बदामातून शरीराला प्रोटिन्स आणि कॅल्शियम मिळते. बदामाचे दूध अथवा बदामाची पूड घातलेले दूध पिऊ शकता. मर्यादीत प्रमाणात गोड पदार्थ खाणार असाल तर त्या पदार्थात बदाम अथवा बदामाची पूड घालू शकता. बदाम मर्यादीत प्रमाणातच खावे.
 4. अक्रोड - वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त पदार्थ. यातून शरीराला फायबर, प्रोटिन आणि व्हिटॅमिन ए मिळते. 
 5. अंजीर - रक्तातील लोह आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त. पोटाचे विकार दूर करण्यासाठीही उपयुक्त.
 6. च्यवनप्राश - दररोज सकाळी किमान एक चमचा च्यवनप्राश खाणे निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहे.
 7. गजक - गुळ आणि तिळापासून तयार केलेले गजक थंडीच्या दिवसांत शरीराला कामासाठी ऊर्जा मिळवून देते. गुळामुळे शरीराला लोह आणि फॉस्फरस मिळते. तर तिळामुळे कॅल्शियम आणि शरीराला आवश्यक असलेले फॅट्स मिळतात.
 8. खजूर - शरीराला आवश्यक लोह, खनिजं, व्हिटॅमिन मिळते. दररोज २० ते २५ ग्रॅम खजुराचे सेवन शरीरासाठी लाभदायी आहे.
 9. दूध - रात्री झोपण्याआधी हळद घातलेले कोमट दूध पिणे थंडीच्या दिवसांत लाभदायी आहे. गरोदर महिला आणि अशक्त व्यक्तींनी रात्री केशर घातलेले एक ग्लास दूध प्यावे.
 10. डिंकाचे लाडू - शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. दिवसभरात अर्धा किंवा एक डिंकाचा लाडू खावा.लाडूमध्ये शेंगदाणा किंवा शेंगदाणा कूट मिसळून ते खाणे थंडीच्या दिवसांत जास्त लाभदायी आहे.
 11. मिश्र डाळींचे लाडू - डाळींमधून प्रोटिन्स मिळतात. केसांच्या समस्या दूर होतात. शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. दिवसभरात अर्धा किंवा एक मिश्र डाळींचा लाडू खावा. लाडूमध्ये शेंगदाणा किंवा शेंगदाणा कूट मिसळून ते खाणे थंडीच्या दिवसांत जास्त लाभदायी आहे.
 12. हिरव्या भाज्या, पालेभाज्या, गाजर - हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे, पालेभाज्यांचे, गाजराचे सेवन करावे. यातून शरीरातील लोह आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मोठी मदत मिळते.
 13. मध - मध नैसर्गिक प्रतिजैविक (अँटीबायोटिक) आहे. मधात औषधी गुणधर्म आहेत. थंडीच्या दिवसांत दररोज सकाळी एक चमचा मधाचे सेवन करावे.
 14. धान्याची पीठं - थंडीच्या दिवसांत विविध धान्याच्या पिठांपासून तयार केलेल्या पोळ्या किंवा भाकऱ्या आलटून पालटून खाव्या. गहू, तांदूळ, नाचणी, वरी (वरई) यांच्यापेक्षा ज्वारीचे सेवन मोठ्या प्रमाणावर करावे. ज्वारीतील फायबर (तंतुमय पदार्थ) पोटाचे विकार दूर करण्यासाठी आणि पचनक्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेह, लठ्ठपणा अशा समस्यांना सामोरे जाणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत ज्वारीच्या भाकऱ्यांचे सेवन करावे.
 15. गायीचे तुप - दररोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या निमित्ताने एक-दोन चमचे गायीच्या तुपाचे सेवन करणे उपयुक्त आहे. तुपाचे सेवन पचनक्षमता सुधारण्यासाठी लाभदायी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी