Weight Loss Success Story | 12वीच्या या मुलाने डाळ-भात खाऊनसुद्धा कमी केले 35 किलो वजन...बदलला संपूर्ण लूक, तुम्हालाही वजन कमी कराचंय?

Shubham Shrivastava success story : लठ्ठपणा, वाढलेले वजन (Over Weight) यामुळे तुम्ही जर त्रस्त असाल तर ही कहाणी तुमच्यासाठीच आहे. वजन कसे कमी (Weight Loss) करायचे आणि नैराश्यातून कसे बाहेर पडायचे याची ही अद्भूत कहाणी आहे. बिहारमधील चंपारण येथील रहिवासी असलेल्या शुभम श्रीवास्तवचे (Shubham Shrivastava) वजन 122 किलो इतके वाढले होते. वयाच्या 17 व्या वर्षी इतके वजन म्हणजे मोठे संकटच होते.

Shubham Shrivastava's wright loss story
शुभम श्रीवास्तवची वजन कमी करण्याची कहाणी 
थोडं पण कामाचं
  • वाढलेल्या वजनामुळे अनेकजण सध्या त्रस्त
  • बिहारमधील चंपारण येथील 17 वर्षे वयाच्या शुभम श्रीवास्तवची अद्भूत कहाणी
  • सहा महिन्यात कमी केले 35 किलो वजन

Shubham Shrivastava's weight loss story : नवी दिल्ली : लठ्ठपणा, वाढलेले वजन (Over Weight) यामुळे तुम्ही जर त्रस्त असाल तर ही कहाणी तुमच्यासाठीच आहे. वजन कसे कमी (Weight Loss) करायचे आणि नैराश्यातून कसे बाहेर पडायचे याची ही अद्भूत कहाणी आहे. बिहारमधील चंपारण येथील रहिवासी असलेल्या शुभम श्रीवास्तवचे (Shubham Shrivastava) वजन 122 किलो इतके वाढले होते. वयाच्या 17 व्या वर्षी इतके वजन म्हणजे मोठे संकटच होते. लठ्ठपणा वाढत असल्याने त्याचा स्वत:वरील आत्मविश्वास कमी होऊ लागला. जेईई परीक्षार्थी असल्याने तो हळूहळू नैराश्याला बळी पडला. अशा परिस्थितीत, त्याच्यासाठी पॅनीक अटॅक आणि चिंता या बाबी किरकोळच होत्या. पण जेव्हा त्याच्या लक्षात आले की लठ्ठपणा त्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो तेव्हा त्याने आपल्या आहाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. असे करताना त्याने अवघ्या 6-7 महिन्यांत 35 किलो वजन कमी केले. शुभमची वजन कमी करण्याची कहाणी खासकरून अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यांना इच्छा असूनही लठ्ठपणा कमी करता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया कसा होता शुभमचा वजन कमी करण्याचा प्रवास. (17 years old Shubham Srivastava lost 35 kg, know his success story)

अधिक वाचा : Weight Loss: हे ५ व्यायाम सर्व वयाच्या महिलांचे वजन कमी करण्यासाठी प्रभावी; दररोज केल्याने होईल फायदा

कोण आहे शुभम श्रीवास्तव-

नाव: शुभम श्रीवास्तव
व्यवसाय: 12वीचा विद्यार्थी
वय: 17 वर्षे
शहर: बेतिया, पश्चिम चंपारण, बिहार
सर्वात जास्त रेकॉर्ड केलेले वजन - 122 किलो
कमी केलेले वजन- 35 किलो
वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ - 6-7 महिने

अधिक वाचा : Women Health | महिलांभोवती पडतोय मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराचा विळखा...व्हा सावध, पाहा कोणाला हा आजार होऊ शकतो, कशी घ्यायची काळजी?

टर्निंग पॉइंट कधी आला?

शुभम सांगतो की, मला माझ्या वजनाची काळजी वाटू लागली. मला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असे वाटल्याने मी मध्यरात्री उठायचो. वाचताना सुद्धा एकच गोष्ट मनात घोळत राहिली की मला ह्रदयविकाराचा झटका आला तर काय होईल. मी माझ्या सर्व आशा गमावल्या होत्या. मी दिवसेंदिवस शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अशक्त होत चाललो होतो. तेव्हा माझ्या वडिलांनी मला वजन कमी करण्यासाठी खूप प्रेरित केले, प्रोत्साहन दिले. एवढेच नाही तर माझ्यासोबत त्याने आपले वजन 26 किलोने कमी केले होते. मी आणि माझ्या वडिलांनी मिळून हा प्रवास सुरू केला आणि ६-७ महिन्यांत हा टप्पा गाठला.

अधिक वाचा : Weight Loss Tips : या हिरव्या फळाच्या सेवनाने वजन लवकर कमी होईल, जाणून घ्या कसे वापरावे

वजन कमी करण्याच्या प्रवासात शुभमचा आहार कसा होता-

न्याहारी-
अधूनमधून 15-16 तास उपवास केल्यानंतर नाश्ता वगळावा लागला. पण सकाळी 11 वाजता त्याने बदाम, खजूर, अक्रोड आणि जर्दाळू खाणे सुरू ठेवले.

दुपारचे जेवण-
घरी बनवलेल्या डाळी, तांदूळ, हिरव्या भाज्या खाल्ल्या. दुपारी १:४५ पर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न केला.

रात्रीचे जेवण-
प्लेटमध्ये दोन ते तीन अंडी असलेली नुसती डाळ होती.
रात्रीचे जेवण 7 च्या आधी झालेले असते.

व्यायामाआधीचे जेवण-
ग्रीन टी आणि सुकामेवा

व्यायामानंतरचे जेवण
सफरचंद, डाळिंब यासारखी फळे आणि चीज

कमी कॅलरी असलेले जेवण
कोशिंबीर आणि फळ

व्यायाम आणि फिटनेस रहस्ये

शुभम म्हणतो, सुरुवातीला माझ्यासाठी गोष्टी सोप्या नव्हत्या. मी रोज स्वतःला ढकलत असे. मी शक्य तितके स्वच्छ आणि निरोगी खाण्याचा प्रयत्न करतो, कारण यामुळे तुम्हाला चांगले आणि उत्साही वाटते.

शुभम म्हणतो की वजन कमी करण्याच्या प्रवासात मी स्लिमर आणि फिटरची कल्पना करत असतो. माझे वडील मला नेहमी सांगतात की माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यांचे शब्द मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देतात. फिट राहण्यासाठी शूभमने आपल्या जीवनशैलीवर लक्ष केंद्रीत केले. योग्य आहार घेण्यास सुरूवात केली. वेटलॉसच्या या प्रवासात शूभम एक गोष्ट शिकला ती म्हणजे आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका आणि धैर्याने, संयमाने काम करत राहा. काहीतरी चांगले होण्यासाठी नेहमी वेळ लागतो.

(डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी