मागील २४ तासात ४१८ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती?

corona positive patients total Patients:देशात मागील २४ तासात   तब्बल ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात १८,५२२ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ५,६६,८४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

corona patients death
कोरोना रुग्णांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ६६ हजारांच्यावर
  • गेल्या २४ तासात देशात ४१८ जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: देशात मागील २४ तासात   तब्बल ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Positive Patient Death) त्यामुळे गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत हा आकडा वाढला आहे. दरम्यान, काल दिवसभरात १८,५२२ नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेने रुग्णांच्या आकडात अल्प अशी घट झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा आणि मृतांचा वाढत जाणारा हा आकडा आता सरकारसाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे.  

भारतात आतापर्यंत एकूण १६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ५ लाख ६६ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ५,६६,८४० रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १६,८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात आतापर्यंत ३,३४,८२२ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या २,१५,१२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण: 

क्रमांक राज्य उपचार घेत असलेले रुग्ण* बरे झालेले रुग्ण* मृत्यू* एकूण रुग्ण*
1 अंदमान आणि निकोबार 44 46 0 90
2 आंध्रप्रदेश 7479 6232 180 13891
3 अरुणाचल प्रदेश 125 61 1 187
4 आसाम 2408 5333 11 7752
5 बिहार 2188 7390 62 9640
6 चंदीगड 80 349 6 435
7 छत्तीसगड 575 2173 13 2761
8 दादरा-नगर हवेली आणि दिव-दमण 126 77 0 203
9 दिल्ली 26246 56235 2680 85161
10 गोवा 717 478 3 1198
11 गुजरात 6871 23240 1827 31938
12 हरियाणा 4476 9502 232 14210
13 हिमाचल प्रदेश 377 556 9 942
14 जम्मू-काश्मीर 2557 4585 95 7237
15 झारखंड 566 1845 15 2426
16 कर्नाटक 6386 7683 226 14295
17 केरळ 2015 2152 22 4189
18 लडाख 347 616 1 964
19 मध्यप्रदेश 2607 10199 564 13370
20 महाराष्ट्र 73313 88960 7610 169883
21 मणिपूर 733 494 0 1227
22 मेघालय 4 42 1 47
23 मिझोराम 93 55 0 148
24 नागालँड 266 168 0 434
25 ओडिशा 1890 4946 23 6859
26 पद्दुचेरी 388 221 10 619
27 पंजाब 1516 3764 138 5418
28 राजस्थान 3637 13618 405 17660
29 सिक्किम 38 50 0 88
30 तमिळनाडू 37334 47749 1141 86224
31 तेलंगणा 9559 5582 253 15394
32 त्रिपुरा 294 1085 1 1380
33 उत्तराखंड 681 2111 39 2831
34 उत्तर प्रदेश 6650 15506 672 22828
35 पश्चिम बंगाल 5535 11719 653 17907
  इतर 7004     7004
  एकूण# 215125 334822 16893 566840
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासात ५२५७ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १,६९,८८३ एवढी झाली आहे. तर २३८५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ८८९६० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७३३१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात १८१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ७६१० रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

दरम्यान, देशात अनलॉक १.० सुरु आहे. अनलॉक १.० मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. दरम्यान, याआधीच झोननुसार काही सवलती देण्यात आलेल्या होत्या. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी