२४ तासात प्रचंड रुग्ण वाढले, महाराष्ट्रातील नेमका आकडा काय?

corona positive patients total Patients: मागील २४ तासात देशात  तब्बल ३८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १९,४५९ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ५,४८,८१३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ४८ हजारांच्यावर
  • गेल्या २४ तासात देशात ३८० जणांचा मृत्यू
  • २४ तासात प्रचंड रुग्ण वाढले, महाराष्ट्रातील नेमका आकडा काय?

मुंबई: Coronavirus india total cases today: देशात मागील २४ तासात बरेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. एका दिवसात जवळजवळ १९ हजारांपेक्षा अधिक  रुग्ण सापडले आहेत. तर काल एका दिवसात तब्बल ३८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू (Positive Patient Death) झाला. काल देशभरात १९,४५९ नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचा आणि मृतांचा वाढत जाणारा हा आकडा आता सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.  

भारतात आतापर्यंत एकूण १६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ५ लाख ४८ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ५,४८,८१३ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १६,४७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढतच आहे. मात्र, देशात आतापर्यंत ३,२१,७२३ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या २,१०,१२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण: 

क्रमांक राज्य उपचार घेत असलेले रुग्ण* बरे झालेले रुग्ण* मृत्यू* एकूण रुग्ण*
1 अंदमान आणि निकोबार 31 45 0 76
2 आंध्रप्रदेश 7164 5908 169 13241
3 अरुणाचल प्रदेश 121 60 1 182
4 आसाम 2108 5088 10 7206
5 बिहार 2034 7118 60 9212
6 चंदीगड 87 336 6 429
7 छत्तीसगड 558 2091 13 2662
8 दादरा-नगर हवेली आणि दिव-दमण 118 60 0 178
9 दिल्ली 27847 52607 2623 83077
10 गोवा 717 478 3 1198
11 गुजरात 6712 22800 1808 31320
12 हरियाणा 4689 8917 223 13829
13 हिमाचल प्रदेश 378 529 9 916
14 जम्मू-काश्मीर 2683 4316 94 7093
15 झारखंड 559 1793 12 2364
16 कर्नाटक 5476 7507 207 13190
17 केरळ 2015 2152 22 4189
18 लडाख 376 586 1 963
19 मध्यप्रदेश 2545 10084 557 13186
20 महाराष्ट्र 70622 86575 7429 164626
21 मणिपूर 730 455 0 1185
22 मेघालय 4 42 1 47
23 मिझोराम 93 55 0 148
24 नागालँड 251 164 0 415
25 ओडिशा 1850 4743 21 6614
26 पद्दुचेरी 388 221 10 619
27 पंजाब 1557 3526 133 5216
28 राजस्थान 3261 13611 399 17271
29 सिक्किम 39 49 0 88
30 तमिळनाडू 35659 45537 1079 82275
31 तेलंगणा 9000 5172 247 14419
32 त्रिपुरा 266 1079 1 1346
33 उत्तराखंड 767 2018 38 2823
34 उत्तर प्रदेश 6679 14808 660 22147
35 पश्चिम बंगाल 5451 11193 639 17283
  इतर 7285     7285
  एकूण# 210120 321723 16475 548318
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासात ५४९३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १,६४,६२६ एवढी झाली आहे. तर २३३० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ८६५७५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७०६२२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात १५६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ७४२९ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

दरम्यान, देशात अनलॉक १.० सुरु आहे. अनलॉक १.० मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. दरम्यान, याआधीच झोननुसार काही सवलती देण्यात आलेल्या होत्या. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी