बापरे... २४ तासात १९ हजारांपेक्षा रुग्ण, महाराष्ट्रातील स्थिती काय?

Corona positive patients total Patients: देशात मागील २४ तासात तब्बल ४१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १९,९०६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ५,२८,८५९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख २८ हजारांच्यावर  
  • गेल्या २४ तासात देशात ४१० जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: देशात मागील २४ तासात आतापर्यंतचे सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. फक्त एका दिवसात तब्बल जवळजवळ १९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. तर काल एका दिवसात तब्बल ४१० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू (Positive Patient Death) झाला. काल देशभरात १९,९०२ नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचा आणि मृतांचा वाढत जाणारा हा आकडा आता सरकारसाठी चिंतांजनक ठरला आहे.  

भारतात आतापर्यंत एकूण १६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ५ लाख २८ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ५,२८,८५९ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १६,०९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढतच आहे. मात्र, देशात आतापर्यंत ३,०९,७१३ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या २,०३,०५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण: 

क्रमांक राज्य उपचार घेत असलेले रुग्ण* बरे झालेले रुग्ण* मृत्यू* एकूण रुग्ण*
1 अंदमान आणि निकोबार 29 43 0 72
2 आंध्रप्रदेश 6648 5480 157 12285
3 अरुणाचल प्रदेश 122 54 1 177
4 आसाम 2307 4500 9 6816
5 बिहार 2029 6843 59 8931
6 चंदीगड 87 335 6 428
7 छत्तीसगड 618 1914 13 2545
8 दादरा-नगर हवेली आणि दिव-दमण 122 55 0 177
9 दिल्ली 28329 49301 2558 80188
10 गोवा 706 420 2 1128
11 गुजरात 6511 22409 1789 30709
12 हरियाणा 4737 8472 218 13427
13 हिमाचल प्रदेश 376 509 9 894
14 जम्मू-काश्मीर 2648 4225 93 6966
15 झारखंड 603 1724 12 2339
16 कर्नाटक 4445 7287 191 11923
17 केरळ 1939 2110 22 4071
18 लडाख 405 554 1 960
19 मध्यप्रदेश 2444 9971 550 12965
20 महाराष्ट्र 67615 84245 7273 159133
21 मणिपूर 660 432 0 1092
22 मेघालय 4 42 1 47
23 मिझोराम 93 55 0 148
24 नागालँड 223 164 0 387
25 ओडिशा 1726 4606 18 6350
26 पद्दुचेरी 388 221 10 619
27 पंजाब 1608 3320 128 5056
28 राजस्थान 3186 13367 391 16944
29 सिक्किम 41 46 0 87
30 तमिळनाडू 33216 44094 1025 78335
31 तेलंगणा 8265 4928 243 13436
32 त्रिपुरा 262 1071 1 1334
33 उत्तराखंड 842 1912 37 2791
34 उत्तर प्रदेश 6685 14215 649 21549
35 पश्चिम बंगाल 5293 10789 629 16711
  इतर 7839     7839
  एकूण# 203051 309713 16095 528859
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय? 

राज्यात गेल्या २४ तासात ५३१८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १,५९,१३३ एवढी झाली आहे. तर ४४३० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ८४२४५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६७६०० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात १६७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ७२७३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

दरम्यान, देशात अनलॉक १.० सुरु आहे. अनलॉक १.० मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. दरम्यान, याआधीच झोननुसार काही सवलती देण्यात आलेल्या होत्या. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी