भयंकर... २४ तासात आजवरचे सर्वाधिक रुग्ण, ६१३ जणांचा मृत्यू; महाराष्ट्रातील आकडा किती?

Corona positive total Patients: मागील २४ तासात देशात  तब्बल ६१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात २४८५० नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ६,७३,१६५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

corona positive patients death 5 July 2020
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ७३ हजारांच्यावर
  • गेल्या २४ तासात देशात ६१३ जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत भीषण होत चालली आहे. कारण मागील २४ तासात देशभरात तब्बल ६१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Positive Patient Death)आजवरचा हा मृतांचा सर्वात मोठा आकडा आहे.  मागील काही दिवसात मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने आता आणखी चिंता वाढली आहे. दरम्यान, मागील २४ तासात देशात तब्बल २४,८५० नवे रुग्ण सापडले आहेत. हा देखील आजवरचा सर्वात मोठा आकडा आहे.

भारतात आतापर्यंत एकूण १९ हजारापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ६ लाख ७३ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ६,७३,१६५ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १९,२६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात आतापर्यंत ४,०९,०८३ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या २,४४,८१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण: 

क्रमांक राज्य उपचार घेत असलेले रुग्ण* बरे झालेले रुग्ण* मृत्यू* एकूण रुग्ण*
1 अंदमान आणि निकोबार 53 66 0 119
2 आंध्रप्रदेश 9473 8008 218 17699
3 अरुणाचल प्रदेश 182 76 1 259
4 आसाम 3997 6657 14 10668
5 बिहार 2925 8686 89 11700
6 चंदीगड 59 395 6 460
7 छत्तीसगड 598 2549 14 3161
8 दादरा-नगर हवेली आणि दिव-दमण 175 96 0 271
9 दिल्ली 25940 68256 3004 97200
10 गोवा 853 825 6 1684
11 गुजरात 7981 25406 1925 35312
12 हरियाणा 4031 12257 260 16548
13 हिमाचल प्रदेश 331 704 11 1046
14 जम्मू-काश्मीर 2976 5143 127 8246
15 झारखंड 687 2035 17 2739
16 कर्नाटक 11970 9244 335 21549
17 केरळ 2131 3048 25 5204
18 लडाख 178 826 1 1005
19 मध्यप्रदेश 2772 11234 598 14604
20 महाराष्ट्र 83311 108082 8671 200064
21 मणिपूर 658 667 0 1325
22 मेघालय 18 43 1 62
23 मिझोराम 34 130 0 164
24 नागालँड 335 228 0 563
25 ओडिशा 2633 5934 34 8601
26 पद्दुचेरी 459 331 12 802
27 पंजाब 1641 4306 162 6109
28 राजस्थान 3445 15640 447 19532
29 सिक्किम 45 58 0 103
30 तमिळनाडू 44959 60592 1450 107001
31 तेलंगणा 10487 11537 288 22312
32 त्रिपुरा 343 1202 1 1546
33 उत्तराखंड 549 2502 42 3093
34 उत्तर प्रदेश 7627 18154 773 26554
35 पश्चिम बंगाल 6329 14166 736 21231
  इतर 4629     4629
  एकूण# 244814 409083 19268 673165
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासात ७०७४ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २,००,०६४ एवढी झाली आहे. तर ३३९५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १,०८,०८२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८३३११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात २९५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ८६७१ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

दरम्यान, देशात १ जुलैपासून अनलॉक २.० सुरु आहे. अनलॉक २.० मध्ये अनलॉक १.० प्रमाणेच काही गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी पुन्हा एकदा कडक अनलॉक करण्यात आला आहे.   

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी