Cough Syrup : कफ सिरप तयार करणाऱ्या 27 कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात, 4 कंपन्यांचे उत्पादन बंद 6 परवाने रद्द

तब्येत पाणी
Updated Mar 03, 2023 | 14:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cough Syrup Company : राज्य शासनाच्या औषध प्रशासन विभागाकडून ज्या 84 कंपन्यांची चौकशी करण्यात आली त्यांना कारणे दाखवण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच इतर ज्या 4 कंपन्या होत्या त्यांना उत्पादन बंद करण्याचे तर बाकीच्या उरलेल्या 6 कंपन्यांना आपले परवाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

27 Orders for inquiry into cough syrup manufacturing companies
कफसिरप प्रकरणी होणार कंपन्यांची चौकशी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • कफ सिरपमधील काही हानीकारक घटक द्रव्यांमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता
  • उत्पादक कंपन्या कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होतात
  • एकूण 996 अ‍ॅलोपॅथिक उत्पादक असून त्यापैकी 514 उत्पादक निर्यात करतात

Cough Syrup Company : शासनाच्या औषध प्रशासन विभागाकडून ज्या 84 कंपन्यांची चौकशी करण्यात आली त्यांना कारणे दाखवण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच इतर ज्या 4 कंपन्या होत्या त्यांना उत्पादन बंद करण्याचे तर उरलेल्या 6 कंपन्यांना आपले परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

निर्यात केलेल्या कफ सिरपमधील काही हानीकारक घटक द्रव्यांमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात तयार होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासूनच पुढे पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील काही उत्पादक कंपन्या कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे फेब्रुवारी 2023 मध्ये आढळून आले. म्हणूनच राज्यातील 200 औषध कंपन्यांची खोलवर तपासणी करुन त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश भाजपाचे आमदार अँड आशिष शेलार यांनी केली होती. 

याबाबत उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना यांनी गांबियामधील 66 मुलांच्या मृत्यूवरून ऑक्टोबर 2022 मध्ये अलर्ट जारी केला होता. त्याअनुषंगे अन्न व औषध प्रशासनाच्या दि. 07.10.2022 परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील लिक्वीड ओरल उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची, अन्न व औषध प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटना यांनी गांबियामधील मुलांच्या मृत्यूवरून जारी केलेल्या बातमीच्या अनुषंगाने तपासणी मोहिम हाती घेतली होती. 

अधिक वाचा : निसर्ग संवर्धनासाठी MMRDA चा उपक्रम, औषधी फुल-झाडांचे प्रदर्शन

राज्यात एकूण 996 अ‍ॅलोपॅथिक उत्पादक असून त्यापैकी 514 उत्पादक निर्यात करतात. तसेच गेल्या वर्षभरात 8 हजार 259 किरकोळ विक्रेत्यांची ही तपासणी करण्यात आली असून 2 हजार परवाना धारकांना कारणे दाखवा तर 424 परवाने रद्द तर 56 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मंत्र्यांनी. सांगितले. तसेच हा विषय गंभीर असून याबाबत लवकरच एक बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही ही मंत्र्यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी