शरीराच्या 'या' तीन भागांपैकी कुठेही दुखत असल्यास वाढत आहे कोलेस्टेरॉल, लगेच करा ही कामं

3 Unusual Symptoms Of High Cholesterol Level, Follow These 6 Tips To Reduce Bad Cholesterol Fast, Read in Marathi : वाढत्या अपायकारक कोलेस्टेरॉलमुळे वेगवेगळे त्रास जाणवत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. 

3 Unusual Symptoms Of High Cholesterol Level, Follow These 6 Tips To Reduce Bad Cholesterol Fast, Read in Marathi
शरीराच्या 'या' तीन भागांपैकी कुठेही दुखत असल्यास वाढत आहे कोलेस्टेरॉल, लगेच करा ही कामं  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शरीराच्या 'या' तीन भागांपैकी कुठेही दुखत असल्यास वाढत आहे कोलेस्टेरॉल, लगेच करा ही कामं
  • रक्तात किती प्रमाणात कोलेस्टेरॉल असावे?
  • कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय करावे?

3 Unusual Symptoms Of High Cholesterol Level, Follow These 6 Tips To Reduce Bad Cholesterol Fast, Read in Marathi : फास्टफूड, जंकफूड, तेलकट पदार्थ खाणे, अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम करणे यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढत असल्याची तक्रार अनेकजण करू लागले आहेत. वाढत्या अपायकारक कोलेस्टेरॉलमुळे वेगवेगळे त्रास जाणवत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. 

कोलेस्टेरॉल म्हणजे काय?

कोलेस्टेरॉल एक असा घटक आहे जो शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये असतो. लाभदायी कोलेस्टेरॉल शरीराला मर्यादीत प्रमाणात हवे असते. या कोलेस्टेरॉलचा वापर शरीरात नव्या कोशिकांच्या निर्मितीसाठी केला जातो. पण अपायकारक कोलेस्टेरॉल असल्यास ते रक्तवाहिन्यांच्या आतील भागात चिकटून रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा निर्माण करतो. रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की रक्ताभिसरणात मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळे रक्तदाबाचा त्रास (ब्लड प्रेशर), मधुमेह (डायबिटिस), हृदयविकार (हार्ट अॅटॅक) असे वेगवेगळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. 

रक्तात किती प्रमाणात कोलेस्टेरॉल असावे?

रक्तात २०० मिलीग्राम प्रति डीएल कोलेस्टेरॉल ही सामान्य स्थिती समजली जाते. पण रक्तात २४० मिलीग्राम प्रति डीएल कोलेस्टेरॉल ही धोक्याची सुरुवात समजली जाते. यापेक्षा जास्त कोलेस्टेरॉल आढळल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

शरीरात प्रमाणापेक्षा जास्त कोलेस्टेरॉल वाढल्यावर आढणारी सहा प्रमुख लक्षणे

शरीरात प्रमाणापेक्षा जास्त कोलेस्टेरॉल वाढल्यास काही काही लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. डॉक्टरांनी अनेक रुग्ण तपासून वाढत्या कोलेस्टेरॉलची सहा प्रमुख लक्षणे सांगितली आहेत. यापैकी एक किंवा जास्त लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, पथ्ये आणि औषधे यांचे पालन करणे हिताचे.

पेरिफेरल आर्टरी डिसिज

अपायकारक कोलेस्टेरॉल वाढल्यास पेरिफेरल आर्टरी डिसिज होण्याचा अर्थात पीएडी होण्याचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांमध्ये अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे रक्ताभिसरणासाठीची मर्यादीत जागा उपलब्ध असते. यामुळे रक्तदाबाचा त्रास (ब्लड प्रेशर), मधुमेह (डायबिटिस), हृदयविकार (हार्ट अॅटॅक) असे वेगवेगळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. 

पीएडी झाल्यास शरीराच्या तीन भागांमध्ये दुखण्याची शक्यता

जिने चढताना पायाचा सगळा मांसल भाग दुखणे हे वाढत्या कोलेस्टेरॉलचे प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने पायाचा कंबरेलगतचा भाग, जांघा आणि पोटऱ्यांचा भाग दुखणे चिंतेची बाब आहे.

कोलेस्टेरॉल कसे कमी करावे?

जीवनशैलीत बदल करून कोलेस्टेरॉल कमी करणे शक्य आहे. यासाठी जंकफूड, फास्टफूड आणि तेलकट पदार्थ खाणे कायमचे बंद करणे आवश्यक आणि हिताचे आहे. साखर, मैदा, मीठ हे पदार्थ खाणे बंद करावे अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादीत प्रमाणात खावे. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राखण्यास मोठी मदत होऊ शकते.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय करावे?

  1. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी  जंकफूड, फास्टफूड आणि तेलकट पदार्थ खाणे कायमचे बंद करणे आवश्यक आणि हिताचे आहे. तसेच साखर, मैदा, मीठ हे पदार्थ खाणे बंद करणे अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादीत प्रमाणात खाणे हिताचे आहे.
  2. चिकन आणि मटण खाणे बंद करणे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
  3. ओमेगा ३ फॅटी अॅसिडसाठी सागरी पदार्थ अर्थात मासे खाणे हिताचे आहे.
  4. ताजी फळे आणि ताज्या भाज्या तसेच प्रोटिन्सचा पुरवठा करणारे डाळीचे वरण/आमटी खावे
  5. शारीरिक व्यायामाचे प्रमाण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात वाढवावे.
  6. धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन तसेच तंबाखू, मावा, गुटखा खाणे बंद करावे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी