वजन कमी करण्यासाठी डाएट करत असताना रात्री उशिरा आपण खाऊ शकता या 5 गोष्टी

weight loss । रात्रीचे जेवण झाल्यानंतरही आपल्याला थोड्या वेळाने रात्री उशिरा आपल्याला भूक लागते का? जर आपण वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर काहीतरी अपायकारक खाण्याऐवजी आपण या 5 गोष्टी खाऊ शकता.

Healthy snacks
वजन कमी करण्यासाठी डाएट करत असताना रात्री उशिरा आपण खाऊ शकता या 5 गोष्टी 

थोडं पण कामाचं

  • ज्यादिवशी आपण विचारपूर्वक खायचे ठरवता त्याचदिवशी लागते रात्री भूक
  • जेवणाचे प्रमाण आणि वेळेकडे ठेवा लक्ष, मात्र भूक न मारणेही महत्वाचे
  • जाणून घ्या कसे कराल पोटाचे समाधान आणि घ्याल डाएटची काळजी

weight loss । रात्रीचे जेवण (Dinner) झाल्यानंतरही आपल्याला थोड्या वेळाने रात्री उशिरा आपल्याला भूक (hunger) लागते का? या भुकेकडे दुर्लक्ष्य (neglect) करणे चांगले नसेत. जर आपण वजन कमी (weight loss) करण्यासाठी डाएट (diet) करत असाल तर काहीतरी अपायकारक खाण्याऐवजी आपण या 5 गोष्टी खाऊ शकता. यामुळे आपली भूकही भागेल आणि वजन कमी करण्यातही मदत करतील. जाणून घ्या कोणत्या आहेत या 5 गोष्टी.

केळी

केळी ही आपल्या शरीरासाठी आणि डोक्यासाठीही चांगली असतात. यामुळे मेलॅटोनीनच्या उत्पादनाला मदत होते ज्यामुळे झोप चांगली लागते. तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत असलेली केळी सहज उपलब्ध होतात. आपण बदामाचे लोणी घालून बनाना स्मूदी बनवू शकता. तसेच दही, आक्रोड आणि केळीही खाऊ शकता.

अंडी

अंड्यांपासून वेगवेगळे खाण्याचे आणि जेवणाचे पदार्थ तयार करू शकता. रात्रीच्या खाण्यासाठीही याचा उपयोग होतो. आपण उकडलेली अंडी फ्रिजमध्ये ठेवू शकता आणि त्यापासून सॅलड तयार करू शकता. आपल्याला जर कॉलेस्ट्रॉलची काळजी अशेल तर अंड्याची फक्त सफेदी खा.

सुका मेवा

सुका मेव्याची एखादी बरणी नेहमी सोबत ठेवा ज्यात बदाम, आक्रोड आणि पिस्ते असतील जेणेकरून कधीही भूक लागली तरी तुम्ही हा आरोग्यपूर्ण खाऊ खाऊ शकता. यामुळे आपली तब्येतही चांगली राहील आणि डाएटवरही परिणाम होणार नाही.

किवी

किवी या हलक्या आणि जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असलेल्या असतात. दोन किवी सोलून त्यांचे तुकडे करून आपण अवेळी लागणाऱ्या भुकेसाठी खाऊ शकता. तसेच चीज आणि ब्रेडसोबतही खाऊ शकता. किंवा किवीच्या वाळवलेल्या तुकड्यांची स्मूदीही तयार करू शकता.

फूल मखणा

फूल मखण्याला कमळबीज म्हणूनही ओळखले जाते. बहुतेक भारतीय घरांमध्ये हा असतो, तसेच रेडी टू ईट असा बाजारात उपलब्धही असतो. याचा वापर खीर, कोशिंबीर किंवा करीसाठी केला जातो. आपण एक छोटी वाटी भरून मखणा मध्यरात्रीचा नाश्ता म्हणून खाऊ शकता.

(सूचना: या लेखातील माहिती आणि सल्ले हे सामान्य माहितीसाठी आहेत आणि याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहिले जाऊ नये. याबाबत काही प्रश्न असतील तर डॉक्टरांशी किंवा व्यावसायिकांशी संपर्क साधावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी