5 healthy breakfast Recipe in marathi: आपण जे सकाळच्या प्रहरी खातो त्याचा प्रभाव पूर्ण दिवस असतो, असे म्हंटले जाते. काही जड खाल्लं, तर दिवसभर पोट जड राहतं आणि काही चटपटीत खाल्लं तर दिवसभर एसिडिटीचा आणि गॅस चा त्रास होतो. त्यासाठीच सकाळच्या नाश्त्यामध्ये अश्या काही गोष्टी खाव्यात ज्या पोटासाठी चांगल्या आहेत, शरीराचे वजन नियंत्रित करण्याबरोबरच शरीराला योग्य पोषक तत्वदेखील मिळेल. या लेखात काही पर्यायी डिश आहेत, जे तुम्ही नक्कीच सकाळी नाश्त्याला ट्राय करू शकतात. जेणेकरून तुमची पंचनशक्ती देखील सुधारेल आणि पूर्ण दिवस तुम्ही ताजेतवाने राहू शकाल.
हे पण वाचा : India Vs Australia: टीम इंडियावर 10 विकेट्सने धमाकेदार विजय
आरोग्यवर्धक आणि पौष्टिक नाश्ता
१. उपमा
नाश्त्यामध्ये उपमा खूप फायदेशीर ठरतो. पचायला हलका असल्यामुळे पोटभरून खालला तरी जड वाटत नाही. प्रोटीनसाठी यात उडीद डाळ देखील टाकली जाते. रवा केल्शीअमचा चांगला स्त्रोत आहे. तसेच उपमामध्ये भाज्या, कडी पत्ता, तिळाचे दाने, वटाणा देखील टाकण्यात येतो. उपमा बनवायला अवघे १५ मिनिट लागतात. सकाळच्या प्रहरी असा हा झटपट नाश्ता बनवणे कधीही योग्य.
२. पोहे
नाश्त्यासाठी पोहे हा देखील एक मस्त पर्याय आहे. हलके, रुचकर आणि पोटाचे आरोग्यसुद्धा स्वस्थ ठेवणारे हे पोहे नक्की करून पहा. यात तुम्ही आवडीनुसार कांदा, बटाटा, टोमेटो आणि मक्याची डाळ टाकू शकता. कडीपत्ता आणि मिरचीची फोडणी देऊन पोहे केले जातात. खाताना मस्त लिंबू पिळून त्याचा आस्वाद घ्यावा. असे हे चविष्ट पोहे लहान मुलांना देखील खूप आवडतात.
हे पण वाचा : ब्लू व्हेलचा हृदय पाहून मुंबईतील घर वाटेल छोटं
३. इडली
उडीद डाळ, तांदळाचे पीठ आणि रव्यापासून इडली बनवली जाते. लाइट ब्रेकफास्ट च्या यादीत या डिश चा पहिला क्रमांक लागतो. इडली खाण्यासाठी चविष्ट तर आहेच, पण वजन कमी करण्यासाठी डाएट म्हणून देखील ती खाल्ली जाते. ही सांभार किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता.
४. बेसण चे धिरडं
चविष्ट आणि पौष्टिक बेसण चे धिरड काही मिनिटात तयार होतो. धिरड बनवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या बारीक कापून त्यात बेसनचे पीठ पानी घालून फेटा. यात चवीनुसार मीठ घालून तव्यावर पसरवा. दोन्ही बाजूने चांगले शिजून घेतल्यावर, पुदिना किंवा टोमेटोच्या चटणीसोबत ते खा.
हे पण वाचा : घनदाट अन् लांब केस हवे तर करा 'हे' काम
५. उत्तपम
जेव्हाही पौष्टिक नाश्त्याबद्दल बोलले जाते तेव्हा दक्षिण भारतीय डीशेसला पाहिले प्राधान्य दिले जाते. रवा किंवा उडीद डाळ आणि तांदूळ भिजवून त्याचे पीठ बनवले जाते. हे तव्यावर थोडेसे तेल किंवा तूप टाकून पसरवले जाते. त्यावर कापलेल्या भाज्या आणि चवीप्रमाणे मीठ टाका. उत्तपम दोन्ही बाजूने शिजू द्या. सांभार आणि चटणीसोबत उत्तपम डिश मध्ये वाढा. हा पदार्थ बनवायला जास्त वेळ लागत नाही, आणि त्यामुळे आरोग्य देखील तंदुरुस्त राहते.