शरीराला लाभदायी असलेले ५ पिवळे पदार्थ

5 yellow fruits vegetables that benefits body शरीराला लाभदायी असलेले ५ पिवळे पदार्थ प्रत्येकाने मर्यादीत प्रमाणात खावे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

5 yellow fruits vegetables that benefits body
शरीराला लाभदायी असलेले ५ पिवळे पदार्थ 
थोडं पण कामाचं
  • शरीराला लाभदायी असलेले ५ पिवळे पदार्थ
  • हिवाळ्यात ताजी फळे, ताज्या भाज्या मोठ्या प्रमाणावर खा
  • शरीराला लाभदायी असलेले पिवळे पदार्थ

5 yellow fruits vegetables that benefits body नवी दिल्ली: हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात अनेक फळे, भाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. आहारतज्ज्ञ पण नागरिकांना हिवाळ्यात ताजी फळे, ताज्या भाज्या मोठ्या प्रमाणावर खाण्याचा सल्ला देतात. प्रामुख्याने हिरव्या भाज्या, पालेभाज्या, गाजर यांचे सेवन करण्याचा तसेच शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यातही शरीराला लाभदायी असलेले ५ पिवळे पदार्थ प्रत्येकाने मर्यादीत प्रमाणात खावे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

  1. अननस - पिवळ्या रंगाच्या या फळातून शरीराला पोटॅशियम तसेच इतर उपयुक्त एंजाइम्स मिळतात. शरीराला आलेली अनावश्यक सूज कमी करणे तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मदत करणे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे यासाठी अननस उपयुक्त आहे.
  2. लिंबू - पिवळ्या रंगाच्या या फळातून व्हिटॅमिन सी मिळते. अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असलेल्या या फळात सायट्रिक अॅसिड असते. लिंबाच्या सालीचा रस त्वचेला चोळल्यास त्वचेवरील अनेक डाग दूर होण्यास मदत होते. लिंबाची फोड सालासकट पाण्यात टाकून ते पाणी उकळवून निम्मे करावे आणि नंतर प्यावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. लिंबाचा रस मर्यादीत प्रमाणात सेवन केला तर रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
  3. मका - शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी तसेच व्हिटॅमिन बी, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी ५ मिळवण्यासाठी मका उपयुक्त आहे.
  4. केळे - पिवळ्या रंगाच्या या फळातून व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे शरीराला आवश्यक घटक मिळतात. पण लठ्ठपणा किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या परवानगीशिवाय केळे खाऊ नका.
  5. पिवळी सिमला मिरची किंवा पिवळी ढोबळी मिरची - सिमला मिरची ही हिरव्या, लाल, पिवळ्या अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. पिवळ्या सिमली मिरचीत मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट आहे. तसेच पिवळ्या सिमला मिरचीत शरीराला आवश्यक व्हिटॅमिन आणि खनिजं आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी