Weight Loss Yoga: योगा से ही होगा ! हे नियमित 5 आसन करतील वजन कमी

तब्येत पाणी
Updated Apr 15, 2023 | 17:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yoga To Reduce Body Fat: योगा वजन कमी करण्याची एक प्रभावी पद्धत आहे. तुम्हीदेखील काही योगासनाचे प्रकार नियमित केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत मिळू शकेल. 

वजन कमी करण्यासाठी आसन
Yoga For Weight Loss  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी हे आहेत 5 महत्वाचे आसन
  • सहज घरात करता येतील हे आसन
  • योगासन शरीर सदृढ आणि लवचिक तर बनवतेच पण त्याबरोबरच मनःशांती साठी देखील चांगले आहे.

Wieght Loss: योगामुळे शरीराची आंतरिक आणि बाह्य आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. योगामुळे तूमचे शरीर निरोगी तर बनतेच, पण त्याबरोबरच ते लवचिक देखील बनते. त्यामुळे शरीराचे आरोग्य सदृढ राखण्यासाठी अनेक लोकं दररोज योगासने करतात. योगासन आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून तुमचा बचाव करते, आणि मनःशांती लाभते ते वेगळे! जर तुम्ही वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला योगा करणे गरजेचे आहे. केवळ वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगासन फायदेशीर असते असे नाही, तर शारीरिक बांधा मजबूत आणि सदृढ बनवण्यासाठी योगासन प्रभावी माध्यम आहे. आपण इथे जाणून घेऊ की वजन कमी करण्यासाठी कोणती योगासने करता येऊ शकतात. (5 yoga poses to lose weight)

अधिक वाचा : ​मुंबई-पुणे मार्गावरील दरीत कोसळली बस; 13 जणांचा मृत्यू

वजन कमी करण्यासाठी आसन  | Yoga For Weight Loss

धनुरासन

धनुष्याच्या आकाराचे आसन म्हणजे धनुरासन, 'द बो पोज' किंवा धनुरासन हे असे योगासन आहे जे केवळ संपूर्ण शरीराचे वजन कमी करत नाही तर पोटाची चरबी वितळण्यासाठी ते अत्यंत प्रभावी आसन आहे. हे आसन केल्याने हात आणि पायांवरील अतिरिक्त चरबी निघून जाते. धनुरासन करण्यासाठी खाली जमिनीवर चटई टाकून पोटावर झोपावे. यानंतर, कंबर जमिनीवर ठेवा आणि शरीराचा वरचा भाग मागे वाकवा आणि हाताने उचलून पाय पकडण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीर धनुष्य सारखे दिसेल.

उत्कटासन

उत्कटासनाला चेअर पोज असेही म्हंटले जाते. हे आसन करताना त्याच्या नावाप्रमाणेच शरीराला खुर्चीच्या आकारामध्ये बनवा. यासाठी सरळ उभे राहून हात डोक्यापासून सरळ वर ठेवा आणि कंबर वकवून नितंब गुडघ्यांच्या बरोबर येतील असा प्रयत्न करा. हा योग केल्याने मांडीची चरबी, हाताची चरबी आणि पोटाची चरबी यावर प्रभाव पडतो. 

अधिक वाचा : ​व्हॉट्सअॅप स्टेटस बदलत तरुणाने केले धक्कादायक कृत्य

कोनासन

वजन कमी करण्यासाठी सर्वात सहज करता येणारा आसन म्हणजे कोनासन, हे आसन करताना, सरळ उभे राहून, पहिला डावा आणि नंतर उजवा हात वर ताणला जातो,  हे आसन केल्याने कंबरेची चरबी झपाट्याने वितळते आणि शरीराचे संतुलन, लवचिकता आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

भुजंगासन

भुजंगासनाला कोब्रा पोज असेही म्हणतात. हे योगासन करण्यासाठी पोटावर झोपावे. यानंतर, हात समोरच्या दिशेने सरळ असायला हवा, हातचे तळवे जमिनीला स्पर्श केलेले असावेत. आता शरीराचा वरचा भाग वर उचलून जितका मागे ताणला जाईल तितका मागे करून ठेवा. काही वेळ या मुद्रेमध्ये बसा. भुजंगासनाला कोब्रा पोझ असेही म्हणतात. हे योगासन जलद वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असे आसन आहे.

फलकासन 

फलकासन एका फळीच्या आकाराचे आसन आहे. फलकासन संपूर्ण शरीराची चरबी जाळण्यासाठी उपयुक्त आहे. या योगाचा हात-पायांवर चांगला परिणाम होतो. फलकासनसाठी तळहातापासून कोपऱ्यापर्यंत हात जमिनीवर तुमच्या समोर ठेवा. यानंतर, पायाची बोटे उचलून संपूर्ण शरीराचे वजन वर धरून ठेवा आणि ह्या मुद्रेमध्ये काही वेळ असेच रहा.   

*टीप - (सदर लेख तुमच्या सामान्य माहितीसाठी असून, कोणत्याही उपचार प्रक्रियेचा अवलंब कारण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला विचारात घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी