२४ तासात ५२ हजाराहून अधिक रुग्ण, ७७५ रुग्णांचा मृत्यू

corona positive patients total Patients: देशात मागील २४ तासात तब्बल ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात ५२,१२३ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण १५,८३,७९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या १५ लाख ८३ हजारांच्यावर  
  • गेल्या २४ तासात देशात ७७५ जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: देशात गेल्या २४ तासात आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. काल  दिवसभरात देशात ५२ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याशिवाय मृतांचा आकडा देखील सर्वाधिक आहे.  मागील २४ तासात देशात तब्बल ७७५ कोरोना रुग्णांचा (Positive Patient Death) मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण आणि मृतांचा हा  आकडा सर्वात मोठा आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे.

भारतात आतापर्यंत एकूण ३४ हजारांहून जास्त पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा १५ लाख ८३ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण १५,८३,७९२ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी ३४,९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात आतापर्यंत १०,२०,५८२ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ५,२८,२४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण: 

S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 225 201 2
2 Andhra Pradesh 63771 55406 1213
3 Arunachal Pradesh 730 677 3
4 Assam 8371 27832 92
5 Bihar 15482 30320 278
6 Chandigarh 353 611 14
7 Chhattisgarh 2855 5636 48
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 376 648 2
9 Delhi 10770 118633 3907
10 Goa 1666 3784 39
11 Gujarat 13535 43195 2396
12 Haryana 6798 26420 413
13 Himachal Pradesh 1057 1332 14
14 Jammu and Kashmir 7749 11322 348
15 Jharkhand 5728 4035 98
16 Karnataka 67456 42901 2147
17 Kerala 10364 11365 68
18 Ladakh 261 1080 6
19 Madhya Pradesh 8357 20934 843
20 Maharashtra 146433 239755 14463
21 Manipur 819 1639 0
22 Meghalaya 572 207 5
23 Mizoram 183 215 0
24 Nagaland 913 595 5
25 Odisha 10077 18939 159
26 Puducherry 1256 1874 47
27 Punjab 4372 10213 361
28 Rajasthan 10745 27569 650
29 Sikkim 397 198 1
30 Tamil Nadu 57490 172883 3741
31 Telengana 14663 43751 492
32 Tripura 1786 2678 21
33 Uttarakhand 2983 3811 72
34 Uttar Pradesh 29997 45807 1530
35 West Bengal 19652 44116 1490
Total# 528242 1020582 34968
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासात ९२११ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ४,००,६५१ एवढी झाली आहे. तर ७४७८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २,३९,७५५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण १,४६,४३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात २९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १४,४६३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी