वाढता वाढता, वाढे... एका दिवसात ५५ हजार रुग्ण, महाराष्ट्रात काय स्थिती?

corona total Patients: देशात मागील २४ तासात तब्बल ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात ५५,०७९ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण १६,३८,८७१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजारांच्यावर  
  • गेल्या २४ तासात देशात ७७९ जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: गेल्या २४ तासात देशात  आजवरचे सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात देशात ५५ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शिवाय मृतांचा आकडा देखील सर्वात जास्त आहे.  देशात  गेल्या २४ तासात तब्बल ७७९ कोरोना रुग्णांचा (Positive Patient Death) मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण आणि मृतांचा हा आकडा सतत वाढतच चालला आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता देखील वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

भारतात आतापर्यंत एकूण ३५ हजारांहून जास्त पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा १५ लाख ३८ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण १५,३८,८७१ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी ३५,७४७ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. 

देशात आतापर्यंत १०,५७,८०६ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ५,४५,३१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण: 

S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 266 201 4
2 Andhra Pradesh 69252 60024 1281
3 Arunachal Pradesh 654 827 3
4 Assam 9233 29080 94
5 Bihar 16845 31350 282
6 Chandigarh 355 647 14
7 Chhattisgarh 2789 5921 51
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 394 668 2
9 Delhi 10743 119724 3936
10 Goa 1657 4005 42
11 Gujarat 13793 44074 2418
12 Haryana 6497 27340 417
13 Himachal Pradesh 1105 1387 14
14 Jammu and Kashmir 7662 11842 365
15 Jharkhand 5888 4176 103
16 Karnataka 69708 46694 2230
17 Kerala 10074 12159 70
18 Ladakh 277 1094 7
19 Madhya Pradesh 8454 21657 857
20 Maharashtra 148454 248615 14729
21 Manipur 829 1672 4
22 Meghalaya 588 210 5
23 Mizoram 174 234 0
24 Nagaland 936 625 5
25 Odisha 10463 19746 169
26 Puducherry 1292 1958 48
27 Punjab 4577 10509 370
28 Rajasthan 11097 28385 663
29 Sikkim 395 214 1
30 Tamil Nadu 57962 178178 3838
31 Telengana 15640 44572 505
32 Tripura 1723 2962 21
33 Uttarakhand 2993 3996 76
34 Uttar Pradesh 32649 46803 1587
35 West Bengal 19900 46256 1536
Total# 545318 1057805 35747
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासात ११,१४७ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता  ४,११,७९८ एवढी झाली आहे. तर ८८६० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २,४८,६१५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण १,४८,४५४  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात २६६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १४,७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी